जिल्हा पोलिस अधिक्षक राज तिलक रोशन यांची बदली तर निवा जैन या उस्मानाबादच्या नविन एसपी

 

उस्मानाबादला प्रथमच महिला पोलीस अधिक्षक

उस्मानाबाद पोलीस दलातील चार अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असुन   पोलीस अधीक्षक रोशन यांची बदली उपयुक्त मुंबई शहर येथे झाले आहेत तर त्यांच्या ठिकाणी उस्मानाबादच्या पोलिस अधीक्षक म्हणून निवा जैन या पदभार घेणार आहेत. जैन या   समादेशक राज्य राखीव पोलीस  बल गट एक पुणे येथून उस्मानाबाद पोलीस अधीक्षकपदी रुजुजु होणार आहेत.
 उस्मानाबाद जिल्ह्याला प्रथमच महिला पोलीस अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे पोलीस अधिक्षक संदीप पालवे यांची बदली पोलीस अधीक्षक दहशतवादी हल्ला पथक औरंगाबाद येथे झाली असुन  त्यांच्या जागी  पोलीस अधीक्षक लोणावळा पुणे येथील नवनीत कुमार रावत यांची बदली उस्मानाबाद आप्पर पोलीस अधीक्षक म्हणून झाली आहे. उस्मानाबाद येथील उपविभागीय पोलिस अधिकारी मोतीचंद राठोड यांची पदोन्नतीने सहाय्यक पोलीस आयुक्त ठाणे शहर येथे बदली झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या