मानव विकास परिषदेच्या महीला परभणी जिल्हा उपाध्यक्षपदी माधुरी लोखंडे पाटील यांची निवड
परभणी रिपोर्टर 


मानव विकास परिषदेच्या परभणी जिल्हा उपाध्यक्षपदी माधुरी लोखंडे पाटील यांची निवड झाली असुन त्यांच्या निवडीचे पत्र संस्थेचे अध्यक्ष अफसर शेख आणि महीला प्रदेशाध्यक्षा जयश्री आहीरे यांच्या वतीने देण्यात आले आहे.या निवडी बददल लोखंडे पाटील यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.

 

 शोषित श्रमिक पोलीस कोठडीत मृत्यू बेकादेशीर अटक शोषण गुलामगिरी दहशत मागासवर्गीय यावर होणारा अन्याय त्याचप्रमाणे सरकारी कार्यालयातून होणारी पिळवणूक मानवी हक्काचे उल्लंघन शासकीय अधिकाराचा गैरवापर भांडवल शाही कडून पैशाच्या व सत्तेच्या जोरावर शासकीय यंत्रणेला स्वार्थासाठी होणारा वापर हे सर्व समूळ नाश करण्यासाठी तसेच सर्वसामान्याचे संविधानिक मानवी हक्कासाठी मिळवून देण्यासाठी तसेच सामान्य जनतेला न्याय अधिकार मिळवून देवून   सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी निस्वार्थपणे ही संस्था काम करते.

 निस्वार्थ वृत्ती आणि प्रमाणिकपणा यामुळे मानव विकास परिषदेला जनतेकडून प्रचंड समर्थन मिळत आहे. या संस्थेच्या महिला परभणी जिल्हा उपाध्यक्ष या पदावर दिनांक 30 आॅगस्ट 2019 ते दिनांक 30 आॅगस्ट 2022 या कालावधीकरिता माधुरी लोखंडे पाटील यांची नियुक्ती करण्यात करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या