उस्मानाबाद रिपोर्टर
भूम तालुक्यातील अवैदरित्या चालणारी चार खडी केंद्र दि.27 आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सील केली.यावेळी,अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती आवले यांची उपस्थिती होती.अनाधिकृतपणे चालणारी ही चार खडी केंद्र यांच्या मालका विरोधात भूम पोलीसात गुन्हा दोंद करण्यात आला आहे.
या कारवाईत उपजिल्हाधिकारी सचिन गिरी, तहसीलदार श्रीमती शृंगारे,नायब तहसीलदार सावंत,राठोड, पाटील तसेच मंडळ अधिकारी स्वामी, पाटील,हाके, तलाठी थोरात, केदार, पाटील तसेच पोलीस ठाणे भूम येथील पोलिस कर्मचारी यांनी सहभाग घेतला. प्रत्यक्ष ठिकाणी ६०० ब्रास हून अधिक बारीक खडी , कच विनापरवाना साठवल्याचे आढळून आले आहे.तसेच यापूर्वी मोठ्या प्रमाणावर टेकडी फोडून उत्खनन केल्याचे दिसून आले. त्याची इ टी (ets मोजणी करून त्याबाबत कारवाई केली असल्याची माहिती मिळत आहे.
0 टिप्पण्या