भूम रिपोर्टर
विविध पोलिस ठाणे अंतर्गत चोरी झालेल्या मोटारसायकल या तपासात ताब्यात घेण्यात आल्या असुन चार दिवसात जवळपास आठ मोटरसायकलचा तपास करून सध्या पोलीस ठाणे भूम येथे मोटारसायकलसह चोरांना जेरबंद केले आहे.
पोलीस निरीक्षक रामेश्वर खानाळ यांच्या मार्गदर्शनात एपीआय मंगेश साळवे यांनी गेल्या चार दिवसात या गाड्या हस्तगत करून मोठी कारवाई केली असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या प्रसंगी नागरिकांनी आपल्या मोटर सायकल ला समोरील टायरला हॅडलॉक लावून ठेवल्याने चोरीचा अनर्थ टाळता येईल,वेळीच खबरदारी घेतल्याने आपले आर्थिक नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी असे पोलिस स्टेशनचे एपीआय मंगेश साळवे यांनी यावेळी सांगितले. सर्व आरोपींना विविध ठिकाणाहून अटक केली असून पुढील तपास रामेश्वर खानाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत.
0 टिप्पण्या