महाराष्ट्राचा खणखणता आवाज ,फायरब्र्ँड युवानेतृत्व युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई .

 

मंत्रालय प्रतिनिधी 


मंञी आदित्य ठाकरे यांच्या मुंबई तील शासकीय बंगल्या वर महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाचे मंञालय मुख्य संपर्क प्रमुख तथा राजकीय विश्लेषक नितीन जाधव यांनी युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांचे सोबत दिलखुलास बातचित केली

तेव्हा वरुण यांची निर्णयक्षमता ,बुध्दीकौशल्याचा उपयोग ,पक्षसंघटनेचे बळकटीकरण सोबत राज्याच्या विकासाचे धोरण तयार असल्याचे जाणवले.


 वरुण सरदेसाई - ग्रेट भेटीमुळे त्यांच्या सध्याच्या राजकीय घडामोडी ,पक्ष संघटनेचे मजबुतीकरण , राजकीय डावपेच,शैक्षणिक ,सामाजिक कार्याचा आढावा मंत्रालय प्रतिनिधी नितीन जाधव यांनी घेतला. 



युवासेनेची ताकद वाढवण्यात धोरणात्मक ,संघटनात्मक निर्णय घेत सबंध महाराष्ट्रात  युवा सेने चा युवा संवाद दौरा आयोजित करुन युवा संवादाच्या माध्यमातून नवयुवकांची , युवा राजकीय पदाधिकार्यांची अभ्यासपूर्ण बांधणी करण्यात युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांचा हातखंडा राहिलेला आहे. युवा संवाद परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र वरुण यांनी पिंजून काढला असून त्यात संघटना बांधणीची धुरा खांद्यावर घेतली व नविन टिम तयार केली. 

त्यांनी प्रथम पुणे , नंतर मराठवाडा ,विदर्भ व उत्तर महाराष्ट्र दौरा केला त्यात नविन तरुणांना संघटनेत स्थान दिले व सामान्य माणसाची प्रगती साधण्यासाठी आपली संघटना कशी आग्रही राहिल याचा विचार केला.या दौऱ्या मार्फत शिवसैनिकांनी केलेल्या कार्याचा आढावा घेतला त्यात कोरोना काळात बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करणे व लोकांना आरोग्य सुविधा पुरवणे अशी कामे केल्याचे निदर्शनास आले.

तसेच वरुण सरदेसाई यांनी केलेल्या युवा संवाद दौऱ्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणां मध्ये प्रचंड उत्साह संचारला असून तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.


 कोण आहेत वरुण सरदेसाई ? युवकां मध्ये त्यांची क्रेझ का वाढतआहे ? राजकीय , शैक्षणिक ,सामाजिक निर्णयक्षम कार्याचा थोडक्यात प्रकाशझोत. 


युवासेनेचे प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे पर्यटण मंत्री आदित्य ठाकरे यांचे मावस बंधू ,मातोश्री चे विश्वासू युवा सैनिक  व मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात. वरुणजी उच्चविद्याविभूषित असून  त्यांनी अमेरिकेत मास्टर आॕफ सिव्हिल ईंजिनिअरींग ची पदवी संपादीत केली  आहे.  त्यानंतर त्यांनी न्यूयॉर्क येथे एक वर्षे बांधकाम क्षेत्रात  ईंजीनिअर पदी नोकरी केली आहे.अभियांत्रिकी चे शिक्षण घेत असतानाच त्यांनी शिवसेनेच्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून कार्य करण्यास सुरुवात केली. अभ्यासा बरोबरच त्यांनी सेनेचा आयटी सेल मजबूत करण्यास सुरुवात केली होती .शिक्षण पूर्ण होताच ते अमेरिकेतून मुंबईत  आले व बांधकाम व्यवसायात मग्न झाले याच दरम्यान 2014 साली युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा आयोजित केला होता त्या मध्ये वरुण जी सामील झाले व प्रचारात उतरले.ते पहिल्यांदा कल्याण चे लोकसभेचे  खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारात दिसले त्यांनी  खूप मेहनत घेतली होती.जेव्हा विधानसभेची युती तुटली तेव्हा त्यांनी शिवसेनेचा स्टार प्रचारक म्हणून स्थान मिळवले व त्याच काळात शिवसेनेचा आयटी सेल अतिशय मजबूत करुन स्वतः वाररुम नियंत्रित केले.


 संपूर्ण महाराष्ट्रत  वरुण सरदेसाई चर्चेत का आले ? 


ठाकरे कुटूंबीय निवडणूक लढवणार असल्याचे सुतोवाच करणारे पहिले निर्णयक्षम दूरदृष्टी असलेले युवा नेतृत्व म्हणजे वरुण सरदेसाई .

2019 च्या विधानसभे पूर्वी आदित्य ठाकरे व स्वतःचा फोटो सोशल मिडीया वर पोष्ट करत - ही वेळ आहे. ही संधी आहे 

म्हणत आदित्य ठाकरे यांना विधानसभेच्या मैदानात उतरविण्यात मोलाचे योगदान देणारा नेता म्हणजे वरुण सरदेसाई .तेव्हा महाराष्ट्र भर वेगवेगळे तर्कवितर्क काढण्यात आले पण आज  सत्य आपणा समोर आहे.

त्यांची एक पोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडवून गेली व तिथूनच महाआघाडी होते की काय असे वाटू लागले.

2019 साली भाजपा सेना सत्ता स्थापनेच्या चर्चा बैठका रंगत असतानाच चाणाक्ष व बुध्दीकौशल्याने परिपूर्ण असलेल्या वरुण सरदेसाई यांनी सोशल मिडीया वर घमासान सुरु केले  व पोष्ट लिहून आक्रमकपणे बेधडकपणे  व्यक्त झाले ..पहिले अडीच वर्षे सेनेचा मुख्यमंत्री तर दुसरे अडीच वर्षे भाजपाचा मुख्यमंत्री असे ठरले ..

यामुळे प्रचंड वाद निर्माण झाला वादग्रस्त व्यक्तीमत्व म्हणून टिका झाली पण ते मागे हटले नाहीत.भाजपाला हा निर्णय मान्य नव्हता .

शेवटी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले व मुख्यमंत्री  पदी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दवजी ठाकरे विराजमान झाले.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले वर मंञालयातील अनेक महत्त्वाच्या बैठका मध्ये पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे सोबत तसेच मंञालयीन उच्चपदस्थांच्या बैठकांमध्ये त्यांची उपस्थिती असायची .याच दरम्यान वरुण हे अनेक महत्त्वाच्या बैठकात भाग घेताना दिसत असल्यामुळे महाआघाडीतील ईतर पक्षाने त्यांचा हस्तक्षेप थांबवला थोडेसे वादंग निर्माण झाल्याचे बोलले जाते .सध्या माञ ते मंञालयात येत नाहीत माञ युवासेनेच्या पक्ष बांधणी मध्ये सतत तत्परतेने कार्यरत असतात.

वरुण सरदेसाई यांना युवा सेनेच्या सचिव पदाची जबाबदारी दिल्या नंतर त्यांना महाराष्ट्र सरकार कडून Y+ दर्जा ची सुरक्षा देण्यात आली त्या वेळी विरोधी भाजप पक्षा कडून जोरदार टिका झाली होती याच दरम्यान सरकारने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा नेते आशिष शेलार यांची सुरक्षा मागे घेण्याचा निर्णय घेतला.


 युवासैनिकांना वरुण यांचा आक्रमकपणा भावला 


सध्या गाजत असलेले केंद्रिय मंञी नारायण राणे यांनी  मुख्यमंत्री यांच्या वर केलेल्या आक्षेपार्ह वादग्रस्त विधानाबाबत तमाम शिवसैनिकाच्या तीव्र निषेध  निदर्शनाचे नेतृत्व महाराष्ट्राचा खणखणता आवाज फायरब्र्ँड युवा नेतृत्व युवासेनेचे सचिव  28  वर्षीय  वरुण सरदेसाई यांनी केले .

या आंदोलनात संपूर्ण महाराष्ट्राने त्यांची आक्रमक शैली ,शिवसेनेचा  खणखणणारा आवाज  पाहीला व मंञी  नारायण राणे यांना थेट आव्हान दिले.या वेळी असंख्य शिवसैनिक ,युवासैनिक त्यांचे सोबत होते त्यांनी नेतृत्व उत्कृष्ट केले पण काही बाबतीत त्यांची वक्तव्ये वादग्रस्त ठरली. काही ही असो राजकारणा मध्ये परिस्थिती अनुरुप निर्णय घ्यावे लागतात माञ वरुण हे  युवकांना मोहनी घालणारे ,महाराष्ट्रातील जनतेचा मना वर अधिराज्य गाजवणारे ,युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली व शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या छञछायेखाली युवासेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शिवसेनेला क्रमांक एक चा पक्ष निर्माण करण्यास कटीबध्द असल्याचे चिञ दिसत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या