जळगाव रिपोर्टर
स्टुडंट्स ऑलिंपिक असोसिएशन जळगाव जिल्हा उपाध्यक्ष दिव्या भोसले यांची उत्तर महाराष्ट्र स्टुडंट्स ऑलिंपिक असोसिएशन झोनल इन्चार्ज प्रमुखपदी यांची निवड करण्यात आली. निवडीचे नियुक्ती पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. दिव्या भोसले यांचे क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील कार्य तसेच संघटनेच्या माध्यमातून घेतलेले कार्यक्रम लक्षात घेता ही नियुक्ती झाली.
स्टुडंट्स ऑलिंपिक असोसिएशन राष्ट्रीय पातळीवर कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करित आहे. स्टुडंट्स ऑलिंपिक असोसिएशन जळगाव जिल्हाध्यक्ष तेजस पाटील व सचिव योगेश चौधरी यांच्या पाठिंब्याने राज्य अध्यक्ष शंकर गायकवाड , राज्य महासचिव सुनील शिंदे व राज्य उपाध्यक्ष नागेश शेट्टी यांनी त्यांची निवड केली आहे. विविध क्षेत्रात कार्य करणारी एक युवा युवती चेहरा म्हणून दिव्या भोसले यांची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख राहिली असून त्यांच्या या निवडीबद्दल सर्वस्तरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
0 टिप्पण्या