उस्मानाबाद रिपोर्टर
शिक्षण क्षेत्रात आपल्या आयुष्यातील मोलाचे योगदान देवून सर्व स्थरापर्यंत शिक्षण पोहचवण्यासाठी प्रयत्न करणारे,स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्यकारणी सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाचे माजी अधिष्ठाता उस्मानाबादच्या उपकेंद्राचे पहिले संचालक, तुळजापूर येथील तुळजाभवानी महाविद्यालय व रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर रमेश दापके यांना यावर्षीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा प्रतिष्ठेचा जीवन साधना पुरस्कार जाहीर झाला असुन त्याचे वितरण उदया दि.23 आॅगस्ट रोजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हास्ते औरंगाबाद येथे होणार आहे.हा पुरस्कार उस्मानाबाद जिल्हयासाठी गौरवाची बाब असल्याने प्राचार्य डॉक्टर रमेश दापके यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.
प्राचार्य डॉक्टर रमेश दापके यांनी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य आणि संस्थेचे सोळा वर्षे माझी मराठवाडा विभाग प्रमुख स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे माजी प्रभारी सचिव पंधरा वर्षे तुळजापूर येथील तुळजाभवानी महाविद्यालयाचे प्राध्यापक व प्राचार्य तसेच उस्मानाबाद येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणुन उल्लेखनीय काम केले आहे. या उल्लेखनीय कार्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने जीवनसाधना हा पुरस्कार प्राचार्य दापके यांना देण्यात येत आहे. मराठवाड्याच्या शैक्षणिक चळवळीमध्ये माजी आमदार वसंतराव काळे यांच्या सोबत प्राचार्य डॉक्टर रमेश दापके यांनी काम केले आहे.तसेच उस्मानाबाद येथे विद्यापीठाचे उपकेंद्र करण्यासाठी या दोघांनी प्रयत्न केले.
पुरस्काराचे वितरण कार्यक्रमाचे राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड हे प्रमुख अतिथी असून अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले आहेत. याशिवाय समारंभामध्ये व्यवस्थापन परिषदेचे सदस्य किशोर शितोळे प्राचार्य कुलगुरू डॉक्टर श्याम शिरसाट कुलसचिव डॉक्टर जयश्री सूर्यवंशी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर नरेंद्र काळे डॉक्टर अजित खान आदि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये औरंगाबाद येथे पुरस्कार वितरणाचा कारर्यक्रम पार पडणार आहे.
0 टिप्पण्या