उस्मानाबाद रिपोर्टर
कोरानाची दुसार लाट कमी होत असली तरी उस्मानाबाद जिल्हया
तील रूग्णांचा आकडा कमी न होता 100 च्या आसपास फिरताना दिसत आहे.शुक्रवारी जिल्हयात 99 पॉझिटिव्ह तर 90 रूग्ण डिस्चार्ज झाले असुन आरोग्य विभागाच्या माहीती नुसार रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.47 टक्के एवडे आहे.
कोरोनाच्या दुस—या लाटेत रूग्ण वाढीसाठी आणि मृत्यू दरासाठी महाराष्ट्रात आग्रेसर असलेला जिल्हा म्हणून उस्मानाबाद जिल्हयाची ओळख निर्माण झाली होती.मात्र आरोग्य विभागाच्या सतर्कतेमुळे एकेकाळी दिवसाला 1000 च्या आसपास नवे रूग्ण आणि 20 ते 21 मृत्यू चे असणारे प्रमाण 0 मृत्यू आणि नवे रूग्ण 100 च्या आसपास असे आहे.आतापर्यंत जिल्हयात एकून 64 हजार 550 रूग्णांची नोंद झाली असुन त्यापैकी बरे झालेले 61 हजार 626 एवडे रूग्ण आहेत.तर उपचारादरम्यान 1429 जनांचा मृत्यू झाला असुन जिल्हया बाहेर स्थाईक झालेल्या पैकी 318 आणि कोवीड बरा झाल्या नंतर 109 असे एकुन 1962 एवढया मृत्यूची नोंद आहे.तर आज जिल्हयात 970 रूग्ण उपचार घेत आहेत.
0 टिप्पण्या