तहसीलदार माळी यांची वाळूसह अवैद गौन खनिज विरोधात मोठी कारवाई- शहरातील सांजारोडवरील 100 ब्रास माल केला जप्त

 
उस्मानाबाद रिपोर्टर 

शहरातील सांजारोड लगत विविध वाळूमाफीयांनी साठवून ठेवलेल्या वाळू, क्रॉस आशा अवैद गौन खनिजा विरोधात दि.28 आॅगस्ट रोजी उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी यांनी धडाकेबाज कारवाई केली. 

या कारवाई दरम्यान एकून 100 ब्रास माल जप्त केला असुन माल कोणाचा आहे हे अदयाप निदर्शनास आले नाही.


उस्मानाबाद शहरातील साजांरोडवरती वाळू आणि क्रॉस साठवून विक्री होत असल्याची माहीती तहसीलदार माळी यांच्यासह त्यांच्या टिमला मिळाली.माहीती मीळताच तहसीलदार माळी यांनी ठिकाणावर जावून साठवून ठेवलेल्या 35 ब्रास वाळू आणि आंदाजे 70 ब्रास क्रॉस असा एकुन 100 ते 105 ब्रास माल जप्त केला.मात्र या कारवाईत कोणत्याही वाळू माफीयाना पकडण्यात आले नसल्याची माहीती तहसीलदार माळी यांनी दिली.करण्यात आलेल्या कारवाईमध्ये तहसीलदार यांच्यासह नायब तहसीलदार तुशार बोरकर,मंडळ अधिकारी देशपांडे,काळे,तलाटी अमोल निरफळ,गुजर,निंबाळकर,

शिंदे,कोळी,कानडे, माळी अदिंचा सहभाग होता. 

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या