रिपोर्टर
भानसाळे हे गाव गेल्या 2 वर्षापासून जगभरात असलेल्या कोरोणा या महामारी पासून निरंक असल्याने सोलापूर जिल्हयामध्ये कोरोना मुक्त गाव म्हणून भानसाळे या गावाची निवड झाली. त्यामुळे भानसाळे ग्रामपंचयत येथे बार्शी तालुक्याचे तहसीलदार शेरखाने साहेब ,नायब तहसीलदार मुंढे साहेब,गटविकास अधिकारी,तलाठी साहेब यांनी येऊन गावचे कौतुक केले व सरपंच शकुंतला धनंजय हिरे, उपसरपंच शिला हिरे, संजय कदम,दिनकर कदम व सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक जाधव भाऊसाहेब,आशा सेविका सीमा पाटील ,अंगणवाडी कर्मचारी रुक्मिणी पाटील , माजी सरपंच माणिक पाटील,पोलीस पाटील जीवन कदम ,यांचा सत्कार तहसीलदार यांच्या हस्ते करण्यात आला. व पुढील काळासाठी गाव कोरोन मुक्त कसे राहील यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.गावच्या वतीनेही सर्व आलेल्या अधिकारी पाहुण्याचा सत्कार या कार्यक्रमावेळी करण्यात आला.
यावेळी गणेश पाटील,धनंजय हिरे,संतोष हिरे,महेश पाटील,राव हिरे ,बबलू बक शेट्टी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
0 टिप्पण्या