न्यायालयीन परिसरातील झेरॉक्स व जॉबवर्क दुकाने रविवारी चालू ठेवण्यास परवानगी

 


उस्मानाबाद:रिपोर्टर 

जिल्ह्यात तालुका व जिल्हा न्यायालयात रविवार दि. 1 ऑगस्ट 2021 रोजी राष्‍ट्रीय लोक अदालतींचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे त्या दिवशी पक्षकार आणि विधिज्ञ यांना कामकाजासाठी जॉबवर्क आणि झेरॉक्स दुकानाची आवश्यकता पडू शकते. त्यामुळे रविवारी ही सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व न्यायालयांच्या परिसरातील जॉबवर्क आणि झेरॉक्सची दुकाने कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याच्या अटीवर चालू ठेवण्यास सूट देण्यात येत आहे.असे जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या