इंग्लिश मिडीयम च्या शाळेपेक्षा जिल्हा परिषदेच्या शाळा जास्त आवडू लागल्या:मंगरूळ टॅलेंट सर्च एक वेध      ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा म्हटले की पालक नकारात्मक रित्या दृष्टिकोण ठेवायचा .पण आता उलट परिस्थिती झाली आहे त्याची कारणे पण तशीच आहेत .सध्या जिल्हा परिषदेच्या शाळा सर्वगुणसंपन्न असणारी प्रत्येक गावात पाहावयास मिळत आहेत .शाळेचे बाह्यरूप व अंतररूप विविध रंगाने रंगविलेले आकर्षक चित्रे, शैक्षणिक सुविचार, गणिताची सूत्रे, पाढे ,म्हणी तसेच विविध विषयांच्या अभ्यासाचे चार्ट भिंतीवर काढल्यामुळे मुलांना व पालकांना शाळा येण्यासाठी आपल्याकडे खुणावत आहेत. डिजिटल शाळा व सर्व भौतिक सुविधा शाळेत असल्याने शाळेत येण्यास विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरत आहेत. या आकर्षक वातावरणात विद्यार्थ्यांना ज्ञान घेण्यासाठी इंग्लिश मिडीयम च्या शाळेपेक्षा जिल्हा परिषदेच्या शाळा जास्त आवडू लागल्या आहेत. त्यामुळेच पालक आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेण्यासाठी सकारात्मकतेने येत आहेत .जिल्हा परिषद शाळेची पटसंख्येत वाढ होताना दिसत आहे.

      मंगरूळ टॅलेंट सर्च एक वेधचा उगम मंगरूळ बीट तालुका तुळजापूर या ठिकाणी झाला. या टॅलेंट सर्च चे प्रमुख मार्गदर्शक म्हणून  या बीटचे  कर्तव्यदक्ष व आदर्श विस्तार अधिकारी माने एम.ई.हे आहेत .यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रप्रमुख श्री संजय वाले ,केंद्रप्रमुख श्री गायकवाड व्ही.एम.भालेकर सुखदेव शिक्षक , मोरे बापूराव शिक्षक , सुसेन सुरवसे शिक्षक , राजाभाऊ क्षिरसागर शिक्षक व इतर शिक्षक यांची समिती नेमून नियोजन करण्यात आले .यामध्ये परीक्षेचे नियोजन व अभ्यासक्रम याबाबत निश्चित करून इयत्ता पहिली ते आठवी मुलांसाठी दररोज दहा प्रश्न तयार करून पाठवण्याची जबाबदारी श्री सुखदेव भालेकर प्राथमिक शिक्षक जि प प्रा शा चव्हाणवाडी यांच्यावर देण्यात आली. त्या प्रमाणे नियमित इयत्ता पहिली ते आठवी वर्गातील मुलांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून नियमित दहा प्रश्न पाठवण्यात आले. नियमित परिपाठाच्या वेळी हे दहा प्रश्न मुलांना लिहून देण्यात आले. सदर उपक्रम सन 2018 -2019 मध्ये वर्षभर घेण्यात आला. प्रश्नावली क्रमांक एक ते प्रश्नावली क्रमांक 121 विद्यार्थ्यांना दररोज पाठवण्यात आल्या . एकूण बाराशे प्रश्न विद्यार्थ्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून चिरकाल लक्षात राहतील अशी पुंजी या उपक्रमांच्या माध्यमातून मुलांना मिळाली.मंगरूळ टॅलेंट सर्च हा उपक्रम बीट मधील 100% शाळेत यशस्वी पणे वर्षभर राबविण्यात आला .या उपक्रमामुळे मुलांच्या सामान्य ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या व ज्ञानवृद्धी वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरला. या उपक्रमाच्या धर्तीवर व समतुल्य असणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेत अनेक मुलांना यश प्राप्त झाले आहे. या यशाचे श्रेय या उपक्रमास जाते .

         स्पर्धा परीक्षेची आवड ग्रामीण भागातील मुलांमध्ये निर्माण झाली .मुलांना वाचनाची आवड निर्माण झाली .मुलांना प्रश्न निर्मिती करण्याबाबत प्रेरणा या उपक्रमामुळे मिळाली. विद्यार्थी येणाऱ्या भविष्यात स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून चांगले अधिकारी बनण्याचे स्वप्न रंगवू लागला. हे सर्व मंगरूळ टॅलेंट सर्च उपक्रमामुळे शक्य झाले.

         ग्रामीण भागातील मुलांना सामान्य ज्ञान घरबसल्या घेता यावे म्हणून मंगरूळ टॅलेंट सर्च 

ॲपची निर्मिती मंगरूळ बीटचे कर्तव्यदक्ष विस्तार अधिकारी श्री माने एम ई,  राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका व तंत्रस्नेही श्रीम रंजना स्वामी मॅडम व तंत्रस्नेही शिक्षक श्री राजाभाऊ क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सुखदेव भालेकर यांनी तयार केले. याचा फायदा मुलांना होत आहे. 

         दररोज पाठवलेले प्रश्न मुलांनी पाठांतर करून व वाचन करून तयारी केली .परंतु अचानक कोरोनासारखे महा भयानक संकट आले. त्यामुळे या बीटमधील टॅलेंट कोण ?याचा शोध घेता आला नाही .परंतु जरी परीक्षा झाली नसली तरी मुलांच्या ज्ञानातील वाढ व स्पर्धा परीक्षेची आवड हेच खरे यश या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागात पोहोचविण्याचे कार्य या उपक्रमामुळे झाले .ग्रामीण भागातील मुले येणाऱ्या काळात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहू लागले आहेत. यावरून ग्रामीण भागातील मुलांचा मंगरूळ टॅलेंट सर्च एक वेध या माध्यमातून नक्कीच प्रगतीच्या दिशेने व भविष्यातील स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने यशस्वी वाटचाल होईल.


श्री सुखदेव विष्‍णू भालेकर

प्राथमिक शिक्षक

जि प प्रा शा चव्हाणवाडी

ता तुळजापूर जि उस्मानाबाद


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या