वाशी रिपोर्टर
वाशी शहरातील माऊली पेट्रोल पंपावर इंधन दरवाढीला वैतागलेल्या नागरीकांनी महागाई कमी करण्यासाठी पाच हजार जनांच्या स्वाक्षरी घेवून महागाईच्या विरोधात स्वक्षरी आंदोलन केले.
केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल,डिझेल, एल.पी.जी,गॅस,यासह इतर जीवनावश्यक वस्तुंची महागाई ने जनतेचे जगने मुश्कील झाले आहे.या जीवघेण्या महागाई विरोधात पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ कमी करा यासाठी नागरीकाची पाच हजार सह्यांची मोहीम आंदोलन कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.ह्या सह्यांचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात येणार आहे.यावेळी कार्यक्रमास उपस्थित (युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस)अवधुत क्षिरसागर,नथुराम गायकवाड(मागासवर्गीय सेल ता.अध्यक्ष),विनयराज पाटील (ता.उपाध्यक्ष),विजय नाईकवाडी, ऋत्विक स्वामी, विशाल घोळवे,सत्यम गपाट, ईश्वर गायकवाड, किशोर घुले, अजय क्षिरसागर, सिद्धेश्वर गायकवाड, सूरज मुळे, नितीन गायकवाड सर्व करकर्ते व पदादीकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या