भूम-रिपोर्टर
जाण्या-येण्यासाठी रस्ता खुला करावा दत्तात्रेय सानप याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल करावा या मागणीसाठी जयवंत नगर तालुका भूम येथील बौद्ध समाजाचे नागनाथ ठोकळे, सूर्यकांत ठोकळे,अमोल समिंदर हे तहसीलदार कार्यालयासमोर दि.१२ रोजी आमरण उपोषणास बसले होते भूम तहसीलदार उषाकिरण श्रृंगारे,गट विकास अधिकारी ढवळशंख यांच्या आश्वासनानंतर हे आमरण उपोषण मागे घेण्यात आले.
याबाबत सविस्तर असे की मौजे जयवंतनगर तालुका भूम येथे शासनाने भूखंड दिले होते या ठिकाणी घरे देखील बांधून दिली होती या घरांना जाण्यासाठी रस्ता होता अनेक भूखंड याठिकाणी शिल्लक आहेत.पण या ठिकाणी ज्या व्यक्तीने 1971 ला जागा दिली होती त्या व्यक्तीच्या वारसाने जागा आहे म्हणून लोकांना येण्याजाण्याचा रस्ता बंद करून व त्या ठिकाणी मोठा खड्डा खोदून या खड्ड्यात उकिरडा टाकला आहे.यामुळे बौद्ध समाजातिल लोकांना याचा त्रास होत आहे. यामुळे ठाणे येण्यास कठीण जात आहे व याचा घाण वास सुटला आहे यामुळे रोगराई होण्याची शक्यता आहे म्हणून हा उकिरडा तात्काळ काढून टाकण्यात यावा व बांधलेले शेडे काढून टाकण्यात यावे रस्ता खुला करून द्यावा या मागणीसाठी व यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार कारवाई करण्यात यावी तसेच बौद्ध वस्तीसाठी बोर व पाण्याची टाकी बांधली आहे याचाही वापर कोणाला हा व्यक्ती करू देत नाही हे टाकीवर सर्वांसाठी खुले करण्यात यावे या मागणीसाठी ठोकळे बंधू यांनी भूम तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला होते या उपोषणाला वंचित बहुजन आघाडीचे उस्मानाबाद जिल्हा प्रशिध्दिप्रमुख मुकुंद लगाडे,आरपीआय मराठवाडा उपाध्यक्ष भागवत शिंदे, अमोल शिंदे, पॅंथर धिरज शिंदे, चंद्रमनी गायकवाड, संदिप सरवदे यांच्या सह अन्य कार्यकर्ते यांनी भेट देऊन संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सहकार्य करावे अशा सूचना दिल्या व हे उपोषण मागे घेण्यात आले.
0 टिप्पण्या