गुरुजी आपल्या दारी ' उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद हायस्कूल भूममधील ऑफलाईन विद्यार्थ्यांना शिक्षण

  

रिपोर्टर:


 भुम येथील जिल्हा परिषद हायस्कूलचे, मुख्याध्यापक तात्या कांबळे यांच्या संकल्पनेतून 'गुरूजी आपल्या दारी ' हा उपक्रम सुरु करण्यात आलेला आहे. कारण शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना आपल्या पालकांच्या गरिबीमुळे  अॅनड्रॉईड मोबाईल नसल्यामुळे ऑनलाईन शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे ही मुले शिक्षणापासून वंचित राहत होती. ही बाब लक्षात आल्यानंतर लॉकडाऊनपासून शाळेतील सर्व मुलांचे अॅनड्रॉईड मोबाईल व अॅनड्रॉईड मोबाईल नसणारी मुले असे वर्गीकरण करण्यात आले.

      शाळेत साबळेवाडी, भोनागिरी, गोरमाळा, वरूड, वाकवड, कासारी या खेडेगावातून तसेच भूमच्या वेगवेगळ्या प्रभागातून मुले शिक्षणासाठी येतात. वरील सर्व खेडी व प्रभागांची विभागणी करून प्रशालेतील सर्व शिक्षकांना गावे व प्रभाग वाटून देण्यात आले. त्यानुसार जे विद्यार्थी ऑफलाईन आहेत. त्यांना शिक्षक आठवडयातील दोन दिवस घरी जाऊन किंवा तीन - चार मुलांना एकत्रित करून अध्यापन करतात.

     सेतू अभ्यासक्रमातील दैनिक अभ्यास मुलांना सोडवता यावा यासाठी त्याच्या झेरॉक्स प्रती काढून मुलांना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार शिक्षक मार्गदर्शन करतात. प्रशालेतील पाटील, डी.जी.,पवार के .सी.,पायघन यु.पी., पवार बी.एस.,जोशी ए.टी., श्रीमती सुरवसे पी.सी., श्रीमती बावकर यु.व्ही.हरीश साठे हे नेमून दिलेले गाव व प्रभाग येथे जाऊन अध्यापन करतात. यामुळे पालक आनंदी असून विद्यार्थी दैनिक अभ्यास करीत आहेत. या उपक्रमाचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बापूसाहेब औताडे व पालकांमधून कौतुक होते आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या