आमदार तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली संपर्क अभियानाची सुरूवात


परंडा रिपोर्टर 

 शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना उपनेते तसेच उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख डॉक्टर तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली संपर्क अभियानाचा कार्यक्रम परंडा तालुक्यातील कंडारी गावी पार पडला. 


या अभियाना दरम्यान शिवसेना युवासेना पदाधिकारी शिवसैनिक यांच्याशी संवाद होत असुन  शिवसेना सामाजिक काम करणारी एकमेव राजकीय संघटना आहे. शिवसेना पक्षाचे ध्येय धोरणे संपर्क अभियानाच्या माध्यमातून शिवसेना प्रत्येक घराघरात व मनामनात रुजविण्यासाठी तसेच सामान्य जनतेच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी असून शिवसैनिकांनी संकटाच्या काळात प्रत्येक घराघरात जाऊन जनतेच्या अडचणी सोडवत पक्षासाठी काम करण्याचे आव्हान यावेळी करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना जिल्हा समन्वयक तथा सभापती दत्ता साळुंखे, शिवसेना जिल्हाप्रमुख गौतम लटके, आमदार तानाजीराव सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे परांडा शिवसेना तालुका प्रमुख अण्णासाहेब जाधव युवा सेना तालुका प्रमुख राहुल डोके,दत्ता भोर सर्कल प्रमुख शाहू खैरे,आप्पा गोडसे सुदाम देशमुख सरपंच उपसरपंच शिवसेना विभाग प्रमुख गन प्रमुख शाखाप्रमुख पदाधिकारी शिवसैनिक युवा सैनिक गावकरी बांधव उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या