उस्मानाबाद रिपोर्टर
- क्रीडात्मक जीवन ही काळाची गरज झाली असून, खेळातून अनेक व्यक्तिमत्व पुढे यावेत व सध्या त्या क्षेत्रात असणाऱ्या सर्वांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्ह्यातील सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असणाऱ्या विवेकानंद युवा मंडळ यांच्या वतीने युवा तायक्वांदो प्रशिक्षक आकाश मोरे व त्यांच्या ४० विद्यार्थ्यांचा प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करून त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.
प्रशिक्षक आकाश मोरे यांच्या विद्यार्थ्यांमधून अनेक विद्यार्थी हे राष्ट्रीय स्तर, राज्य स्तर तर जवळ जवळ सर्वच बाकीचे विद्यार्थी हे जिल्हा, विभाग स्तरांमध्ये पात्र ठरले आहेत. त्या मुलांना या सत्कारामुळे प्रोत्साहन मिळेल व त्यांच्या पालकांनाही स्फुर्तीचे केंद्र तयार होईल या उद्देशाने हा सत्कार समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा सत्कारासोबतच त्यांच्या पालकांना देखील सत्कार करण्यात आला व यापुढेही कोणत्याही कामासाठी सर्वांसाठी विवेकानंद युवा मंडळ हे कायम तत्पर राहील असे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित सर्वांना सांगितले. कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे, अखिल भारतीय छावा मराठा संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र साळुंके, छावा युवक जिल्हाध्यक्ष कैलास गायकवाड, तेजस्विनी फाउंडेशनच्या अँड.तेजश्री पाटील यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिक महिला व अनेक नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. यावेळी कार्यक्रमाची आयोजन समितीचे व विवेकानंद युवा मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण साळुंके, कार्यक्रम समन्वयक अनिकेत माने, वैभव कुलकर्णी, शुभम कदम, मंडळाचे सदस्य समर्थ शिरसीकर, स्वप्नील देशमुख, क्रांतिसिंह काकडे, बालाजी माने, वैजिनाथ माने, शिवरत्न नलावडे, बनसोडे सर, शंभूराजे कोकीळ व आदी युवा कार्यकर्त्यांचे कार्यक्रमास सहकार्य लाभले.
0 टिप्पण्या