आदयावत साधन सामुग्री असुनही जिल्हा शासकिय रूग्णालयातील आयसीयू सेंटर फेल:हुशार डॉक्टरांची गरज:नातेवाईकांमुळेच वाचले आनेक रूग्णांचे प्राण

 

प्रत्येक्षदर्शी रिपोर्ट 

जिल्हा शासकीय रूग्णालयातील आयसीयू  सेंटर सोई सुविधांनी आगदी भरगच्च आहे.मात्र हुशार आणि कार्यतत्पर डॉक्टरांचा अभाव असल्याने जिल्हा शासकीय रूग्णालयातील आयसीयू  सेंटर मधील मृत्यूचे आकडे वाढत गेले असल्याचे दिसुन येते. रूग्णांजवळ असलेल्या नातेवाईकांच्या सतर्क राहण्यामुळे आणि ट्रेनी डॉक्टर आणि परिचारीका यांनी निभावलेल्या जिम्मेदारीमुळे काही जनांचे प्राण वाचले. आशा महामारीच्या वेळी तज्ञ डॉक्टरांची आवश्यकता आहे.मात्र सिव्हिल सर्जन आणि कामचुकार डॉक्टरामुळे आनेकांना आपले प्राण गमवावे लागले.  


कोरोनाच्या दुस—या लाटेत कल्पनेच्या बाहेर मृत्यूचे आकडे समोर आले.महाराष्ट्रासह देशातील आरोग्य यंत्रना महामारीच्या समोर हातबल झाली होती.आरोग्य विभागातील काही प्रमाणीक डॉक्टर आणि कर्मचारी यांनी आपला जिव पणाला लावून काम केले.उस्मानाबाद जिल्हा तर मृत्यूच्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात आग्रेसर होता.राज्य सरकारच्या आरोग्य मंत्रालयांनी उस्मानाबाद जिल्हा रूग्णालयाला गरजेनुसार साधन सामुग्री दिली आसताना सुध्दा उस्मानाबाद जिल्हा रूग्णालयातील आयसीओ सेंटर मृत्यूचा आकडा कमी करण्यास आपयशी ठरले.त्याचे कारण म्हणजे वरिष्ठ डॉक्टरांचे नियोजन आणि वसील्याच्या डॉक्टरांची भरती हेच म्हणावे लागेल. कोरोना रूग्णांना कोनी वालीच नसल्याने चित्र गेल्या दोन महिण्यात जिल्हा शासकीय रूग्णालयात पाहायला मिळत होते.ही सगळी  परिस्थिती पाहुन रूग्ण आणि नातेवाईकांच्या मनात नेहमी मृत्यूची भिती कायम असल्याचे पाहायला मिळत होते. 24 तासाला एकदा राउंड मारणा—या डॉक्टरांचे काम कमी आणि रूबाब जास्त असल्याने पेशेंटकडे लक्षदेण्या एैवजी जवळ असलेल्या नातेवाईकाना बिनाकामाचा उपदेश आणि नातेवाईकां बरोबर तक्रारी करण्यातच डॉक्टरांचा वेळ जात असे.डॉक्टर काहीतरी बोलतील म्हणुन मरणाच्या दारात असलेले पेशेंट काय? त्रास आहे हे सांगण्यास डॉक्टरांना भित आसत.उस्मानाबाद जिल्हा रूग्णालयामध्ये सिव्हील सर्जन आणि डॉक्टर यांनी कोरोना रूग्णांना बेदखल केले असताना मात्र रूग्णालयातील ट्रेनी डॉक्टर,परिचारीका आणि सफाई कामगार यांनी जिव ओतुन काम केल्याने आसख्य रूग्णांना आधार मिळाला.महत्वाचे म्हणजे आयसीयू  सेंटर मध्ये कोनाची दिवटी असावी याच सुध्दा नियोजन जिल्हा रूग्णालयात पाळण्यात आले नाही.ज्या परिचारीकांना आयसीओ सेंटर साभाळण्याचा कसलाच आनुभव नाही आशा महीला कर्मचा—यांची नियुक्ती आयसीओ सेंटरमध्ये केली जात होती.त्यामुळे आॅक्सीजन डब्ब्यातील पाणी सुध्दा नातेवाईक नाहीतर रूग्णांना भरण्याची वेळ येत होती.आशा प्रकारे मागील दोन महिण्यामध्ये सिव्हील सर्जन आणि डॉक्टरांच्या बेजबाबदार वागण्यामुळे उस्मानाबाद जिल्हा रूग्णालयातील आयसीयू  सेंटर मधील मृत्यूचा आकडा वाढत गेला.प्रत्येक्षदर्शी   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या