आमदार तानाजी सावंत यांच्यासह शिवसेनेकडून स्वप्नीलच्या कुटूंबियांना 10 लाखाची मदत


रिपोर्टर 

एमपीएससी पास होवून सुध्दा लवकर नियुक्ती होत नसल्यामुळे आत्महात्या केलेल्या स्वप्नील लोणकरच्या कुटूंबियांची सात्वनपर भेट घेवून सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि उस्मानाबाद,सोलापूर जिल्हयाचे संपर्कप्रमुख आमदार तानाजी सावंत यांनी स्वप्नीलच्या कुटूंबियांना 10 लाख रूपयाची मदत केली व स्वप्नीलच्या बहिनीच्या शिक्षणाची सर्वतोपरी जिम्मेदारी घेतली. 


स्वप्नीलच्या जाण्याने लोणकर कुटूंबियांवर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.या कुटूंबाच्या उदरर्निवाहाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे. शिवसेना पक्षाकडून 5 लाख रू व भुम परंडा वाशी चे आमदार डॉ.तानाजी सावंत यांच्याकडून 5 लाख रूपये असे 10 लाख रूपयांची मदत लोणकर कुटूंबियांना करण्यात आली. व स्वप्नीलच्या बहिनीच्या शिक्षणाची सर्वतोपरी जिम्मेदारी घेवून कोणत्याही प्रकारची मदत लागली तर केव्हाही संपर्क साधा असे अश्वासन यावेळी लोणकर कुटूंबियांना देण्यात आले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या