तुळजापूर तालुक्यात कोहीजन संस्थेने केलेल्या जलसंधारण कामाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते जलपुजन व लोकार्पणरिपोर्टर 

 सर्वांगीण ग्रामीण विकास कार्यक्रमांतर्गत कोहीजन फाउंडेशन ट्रस्ट मार्फत राबवत असलेल्या व एचडीएफसी बँक सीएसआर यांच्या आर्थिक सहयातून मागील वर्षभरापासून तुळजापूर तालुक्यातील 10 गावामध्ये विविध ग्रामीण विकासाची कामे सुरू आहेत.प्रकल्पांतर्गत मौजे खंडाळा, देवसिंगा (तु) तीर्थ खु.,राईखेल आणि बिजनवाडी, या गावात जलसंधारणाची कामे सुरु आहेत.मौजे खंडाळा येथे बांधण्यात आलेल्या नवीन बंधारा आणि मौजे देवसिंगा (तु.) येथे बोरी नदीचे पुनुरुज्जीवन कामाचे लोकार्पण व जलपूजन मा. श्री. कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याच्या निमित्ताने जिल्हाधिकारी यांनी मौजे खंडाळा, देवसिंगा (तु.), सलगरा, बोरीनदीवाडी येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. जलसंधरणाच्या छोट्या कामातून जलव्यवस्थापन व पिक व्यवस्थापनाकडे शाश्वत शेतीकडे शेतकऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे असे जिल्हाधिकारी म्हणाले. शेतकऱ्यांनी आपल्या शेतरस्त्यांचे प्रश्न आपसातील सामंज्यसाने सोडविणे गरजेचे आहे तसेच याबाबतीत प्रशासनातर्फे योग्य ते सहकार्य केले जाईल याची ग्वाही दिली. सर्व महिलांनी एकत्र येऊन स्वतःचा सर्वांगीण विकास साधला पाहिजे व शासनाच्या विविध सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ घेतला पाहिजे असे मार्गदर्शन केले  सर्वांगिण ग्रामीण विकास कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या कामाचे जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक करण्यात आले.  यानिमित्ताने मा. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते मौजे खंडाळा व मौजे देवसिंगा (तु.) येथे वृक्षारोपन करण्यात आले. या सोहळ्यास मा. तहसीलदार तुळजापूर श्री सौदागर तांदळे, मा. जिल्हा कृषी अधीक्षक, श्री यु आर घाटगे एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापक, श्री आबासाहेब काळे श्री शिंदे व मौजे खंडाळा गावचे सरपंच श्री लोखंडे मौजे देवसिंगा गावच्या सरपंच सौ  मनीषा नेताजी जाधव, उपसरपंच किरण जाधव, दत्ता मस्के, ग्राम सेविका श्रीमती. कांबळे, टाटा संस्थेचे डॉ. शहाजी नरवडे, डॉ. गुणवंत बिराजदार, गणेश चादरे व गावकरी उपस्थित होते.

सर्व मान्यवरांचे स्वागत कोहिजन फाऊंडेशन ट्रस्टचे प्रकल्प समन्वयक श्री दयानंद वाघमारे यांनी तर सुत्रसंचालन श्री मनोहर दावणे यांनी केले.  कार्यक्रमाचे आभार सुवर्णा कांबळे व  ग्रामस्थांकडून मानण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोहीजण संस्थेचे श्री भोसले श्री फुंदे श्री कांबळे श्री गवळी श्री बनसोडे श्री कदम व सौ  कुलकर्णी यांनी मेहनत घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या