बंद असलेले खाजगी क्लासेस सुरू करण्यास परवानगी दया: दत्ता कुलकर्णी

 


रिपोर्टर 


कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गेल्या वर्षी पासुन बंद असलेले खाजगी क्लासेस सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी आशा मागणीचे निवेदन भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी जिल्हाधिकारी कौस्तुब दिवेगावकर यांना दिले आहे.


मागील वर्षभरापासून चालू असलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा, महाविद्यालये, खाजगी शिकवण्या पुर्ण अवस्थेने बंद आहेत. ऑनलाईन शिक्षण पद्‌धतीच्या माध्यमातून सध्या विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू आहे. पहिल्या लाटेमुळे मागील वर्षी प्रत्यक्षात शिक्षण व्यवस्था ही चाललीच नाही. या वर्षी पण दुसऱ्या लाटेमुळे शाळा, महाविदयालयाच्या माध्यमातुन सुरू आसलेले आॅनलाईन पध्दतीचे शिक्षण हे विदयार्थ्याच्या शैक्षणीक भविष्यासाठी पुरेसे नसल्याने विदयार्थ्याचे शैक्षणीक नुकसान होत असुन त्यांच्या बुध्दीमतेवरही त्याचा परिनाम होत आहे.केंद्र आणि राज्य सरकारने घालुन दिलेल्या कोरोनाच्या नियम व आटीचे पालन करूण खाजगी क्लासेस चालवण्यास परवानगी देण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे. 

          कोरोना प्रादुर्भाच्या दुसऱ्या लाटेमुळे व संभाव्य येणाऱ्या तिसऱ्या लाटेमुळे शाळा चालू होण्याची शक्यता धुसर दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या निर्माण होणाऱ्या शैक्षणिक शंका निरसनासाठी खाजगी शिकवणी (ट्‌युशन) वर्गास मान्यता द्यावी व विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवावा अशी मागणी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या