रिपोर्टर
पुढील पाच दिवसांमध्ये देशाच्या विविध राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यादृष्टीने स्थानिक प्रशासनाने दक्ष राहावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
नैऋत्येकडून येणाऱया जोरदार वा—यामुळे पाऊस पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ईशान्येकडील राज्यांच्या दिशेने सरकण्याची अधिक शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. परिणामी 1 जुलैपर्यंत अतिमुसळधार पाऊस अनेक राज्यांमध्ये होईल. त्यात किनारपट्टीच्या महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकचाही समावेश असेल, असे हवामान तज्ञांनी म्हटले आहे.
नैऋत्य मोसमी वाऱयांचा वेग राजस्थान, पंजाब, हरयाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशाकडे अधिक आहे. या राज्यांसह हरयाणा आणि दिल्ली तसेच किनारपट्टीच्या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. गुरुवारी अरुणाचल प्रदेशचा काही भाग, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, बिहार, तेलंगणा, केरळ, लक्षद्वीप आणि कर्नाटकमध्ये जोरदार वाऱयासह पावसाची शक्यता आहे.
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसाबरोबरच बर्फवृष्टीही होईल. ओरिसा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश आणि तामीळनाडूमध्ये मुसळधार पाऊस होईल तर झारखंड, पूर्व मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, अंदमान-निकोबारमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस होत राहील, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
0 टिप्पण्या