महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे 18 लाखाला चुना डिकसळमध्ये एका रात्रीत 42 टीव्ही ,26 फ्रीज, 49 फॅन कुलरमधून धूररिपोर्टर: विलास मुळीक  तालुक्यापासून  हाकेच्या अंतरावर असलेल्या डिकसळ गावात गेल्या अनेकवर्षांपासून महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. मंगळवारी ( दि.१५ )  तर एका रात्रीत 42 टीव्ही 26 फ्रीज 49 फॅन, कुलर , मोबाईल ,  चार्जर व पाचशे पेक्षा अधिक बल्ब मधून धूर निघाला आहे . त्यामुळे डिकसळ गावकऱ्यांचेेेे 17 ते 18 लाख रुपयापेक्षा अधिक नुकसान झाले आहे .एवढे सगळे रामायण घडून देखील आपल्याच मस्तीत सुस्त असलेल्या प्रशासनला अजूनही जाग आली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.   गावकऱ्यांच्या घरात  धूर काढणाऱ्या  महावितरणने झालेल्या नुकसाणीची भरपाई द्यावी अन्यथा प्रशासनाविरुध्द्व गावकरी  आंदोलन करण्याच्या तयारीला लागले आहेत. 

        गेल्या अनेक वर्षांपासून डिकसळ मूळ गावात विजेचा लपंडाव सुरु आहे. एकाच डीपीवर सगळ्या गावचा कारभार लादल्यामळे चिमणीच्या उजेडासारखा उजेड पडत आहे. सहा महिन्यात दहा वेळा येथील ट्रांसफार्मर जळाला आहे . पावसाचा थेंब किंवा वाऱ्याने पान जरी हालले तरी वीज गुल होत आहे.याबाबत  कार्यालायाकडे सातत्याने ग्रामस्थांनी पाठपुरावा केला तरीही मुजोर प्रशासनाकडून  कुठलीच दखल घेतली जात नाही.  त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी महावितरण विरोधात जोरदार रणशिंग फुंकत आंदोलन उभा करायला सुरुवात केली आहे.  

         गावात वीज कमी दाबाने वीज पुरवठा होणे, वारंवार लाईट जाणे यासारख्या शेकडो समस्यांना गावकरी तोंड देत आहेत . त्यातच मंगळवारी रात्री अधिक दाबाने विद्युत प्रवाह तारेत सोडण्यात आला होता  त्यामुळे एका क्षणात  लाखो रुपयांचे गावकऱ्यांचे नुकसान झाले आहे.  तसेच गावात लाईट नसल्यामुळे गावात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे . तारा  डोक्याला लागल्यामुळे आतापर्यंत तीन जणांचा बळी गेला आहे . यासारख्या शेकडो समस्यांनी अडचणीत सापडलेल्या गावकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाला जाग तरी कधी येणार असा सवाल ग्रामस्थांमधून विचारला जात आहे.  निष्क्रिय अधिकारी आणि मुजोर खाजगी गुत्तेदारी 

सर्वसामान्य माणसांच्या जीवावर उठलेल्या महावितरण कार्यालयात सद्या सावळा गोंधळ सुरु आहे शेकडो समस्यांनी मेटाकुटीला आलेल्या ग्रामस्थांना  शुल्लक कामासाठीही शेकडो चकरा माराव्या लागतात या कार्यालयात काम करणारे अनेक कर्मचारी दुसऱ्याच्या नावाने राजरोजसपणे आपली खाजगी ठेकेदारी जोरात चालवतात . त्यामुळे योग्य ते प्रमाणात महावितरणची कामे होताना दिसत नाहीत.


खासदार व आमदार यांच्या आदेशालाही कचराकुंडी 

शिवसेनेचे खासदार ओम राजेनिंबाळकर व आ. कैलास पाटील यांनी अनेकवेळा डिकसळ गावच्या वीजप्रश्नावरून  महावितरणच्या अधिकाऱ्यांना झापझाप झापले होते त्यावर अधिकाऱ्यांनी आठ दिवसात काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र खासदार व आमदार साहेबांच्याही आदेशालाहि न जुमानण्याचे काम या निर्धास्त प्रशासनाने केले आहे. त्यामुळे आता तक्रार तरी करायची कोणाकडे असा प्रश्न पडला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या