महावितरणचा भोगळ कारभार शेतकऱ्यांच्या मुळावर - .वीजेचा लंपनडाव सुरू: दोनही वाफे भिजेना

 


परंडा / रिपोर्टर 


शेतकऱ्यांना सध्या महावितरण च्या भोंगळ कारभारामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे .अनेक वेळा अनेक कारणामुळे वीज पुरवठा खंडित होत आहे . कमी दाबाने वीज पुरवठा होत आसल्याने पीकास पाणी देता येत नाही . पाणी आसुनही वीजेअभावी पीके जळून जायला लागली आहेत . कृषी पंप व घरगुती वीज बील वसूली  महावितरणने केली आहे . मात्र कारभार सुधारत नाही .

वीज पुरवठा बंद झाल्याची साधी तक्रार करण्यासाठी फोन केल्यास फोन सुद्धा महावितरण कार्यालयात उचलला जात नाही .  लॉक डाऊन नंतरच्या काळात एवढे काम नसताना एवढा वीज वापर होणे शक्य नाही हे अडाणी माणसाला सुद्धा कळते ते महावितरणच्या बिलिंग विभागाला कळत नाही का ? तसेच बिल न भरल्यास वीज पुरवठा खंडित केला जात आहे . वसुलीसाठी महावितरण कर्मचारी तातडीने हजर होऊन बिलासाठी तगादा लTवला जात आहे . मात्र वारंवार वीज खंडीत झाल्यावर , ट्रान्सफार्मसी फेज गोल्यावर कर्मचारी फिरकत नाहीत ग्राहकांना जीव धोक्यात घालून दुरुस्ती करावी लागते .


 

 अनेक ठिकाणी पावसाळ्या पूर्वीची दुरुस्तीची कामे झाली नाहीत त्यामुळे वीज खंडित होण्याचे ,केबल नादुरुस्त होण्याचे होत आहेत . तसेच महावितरणने मोघम बील देण्या ऐवजी प्रत्यक्ष वीज मीटर चे रीडिंग घेऊन बिल दिले पाहिजे त्यामुळे ग्राहकांना मनस्थाप होणार नाहीत . व बीला संदर्भात तक्रारी होणार नाहीत . ज्यांच्या बीला संदर्भात तक्रारी आहेत त्यांचा तातडीने बीज बिल दुरुस्त करून दिले पाहिजे अशी मागणी होत आहे . 

महावितरण ने आपला भोंगळ कारभार सुधारला नाही. कायदा हातात घ्यायला लागेल. असा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष शंकर घोगरे यांनी दिला आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या