उस्मानाबाद रिपोर्टर
धाराशिव साखर कारखाना लि.चोराखळी येथे उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी ऑक्सिजन निर्मितीच्या पायलट प्रकल्पास भेट दिली.
देशासह राज्यात कोरोना महामारीचं संकट दिवसेंदिवस वाढू लागलं आहे. सर्व राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या झूम मिटींगव्दारे व मौज इंजिनिअरींगच्या माध्यमातून धाराशिव साखर कारखान्यामध्ये महाराष्ट्रात प्रथमच ऑक्सिजनची निर्मिती 'पायलट प्रकल्प' सुरू करण्यात येत आहे.
धाराशिव साखर कारखान्यावर ऑक्सिजन निर्मिती करण्याचे प्रयत्न मोठ्या शर्तीवर सुरू आहेत. त्यातच आज वाढत्या ऑक्सिजनच्या मागणीमुळे जिल्हाधिकारी साहेब यांनी धाराशिव साखर कारखान्यावर जाऊन पाहणी केली. यावेळी कारखान्याचे चेअरमन श्री.अभिजीत पाटील, पुणे मौज इंजिनिअरींगचे श्री.धिरेन ओक, श्री.भारी यांनी प्रकल्पाबाबत संपुर्ण माहिती दिली. जिल्हाधिकारी यांनी लवकरात लवकर प्रकल्प चालू करून ऑक्सिजनचा पुरवठा सुरू करावा असे सांगितले.
इथेनॉलची निर्मिती थांबून ऑक्सिजनचा प्रकल्प सुरू करण्याचे धाडस दाखवून सामाजिक बांधिलकीचे पाऊल टाकले आहे. कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्यांना लाखोंना जीवनदान देण्याचे काम अभिजीत पाटील यांच्याकडून होईल त्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी विशेष कौतुक केले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती.रुपाली आवले ,निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपविभागीय अधिकारी कळंब डॉ.श्रीमती.अहिल्या गाठाळ ,तहसिलदार रोहन शिंदे,मंडळ अधिकारी देवानंद कांबळे,चोराखळी तलाठी श्रीकृष्ण कावळे आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या