बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचारी वर्गास लसीकरणासाठी प्राधान्य द्यावे – दत्ता कुलकर्णी.


रिपोर्टर 


मागील वर्षभरापासून सुरु असलेल्या कोरोना प्रादुर्भाव कालावधीमध्ये बँकिंग क्षेत्रात काम करणारे कर्मचारी, अधिकारी व त्या क्षेत्रात काम करणारी व्यक्ती सक्षमपणे आपली सेवा करताना दिसत आहेत.

          बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कात अनेक व्यक्ती रोजच्या रोज दैनंदिन व्यवहारामध्ये येतात. कोरोनाच्या प्रादुर्भावा बाबतचे सर्व नियम पाळूनच बँकिंग चे कामकाज होत असले तरीही बँकिंग मधील व्यक्तींना कोरोना संसर्गाचा धोका अधिक प्रमाणात आहे याची शक्यता नाकारता येत नाही.

          जिल्ह्यातील सर्व बँका, सहकारी बँक, खाजगी बँक, मल्टीस्टेट, पतसंस्था व आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वाना सरकारने प्राधान्याने लसीकरण करावे अशी मागणी दत्ता कुलकर्णी यांनी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या