आर्थिक संकटातुन सलून दुकानदाराची विष घेवून आत्महत्या
​उस्मानाबाद रिपोर्टर 


उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार  घेत  असताना 
झाला मृत्यू 


उस्मानाबाद - शासनाने घालून दिलेल्या लॉकडाऊनच्या  नियमानुसार केसकर्तनालयाची दुकाने देखील बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान, यामुळे अनेक दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. यातूनच एका केसकर्तनालयाच्या  दुकान मालकाने आत्महात्या केल्याचे समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 


उस्मानाबाद  तालुक्यातील सांजा गावातील मनोज झेंडे या नाभिक समाज बाधवाचे सलुन दुकान होते,घरची परिस्थिती बेताची होती. दैनंदिन सलून व्यवसायावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे मात्र काही दिवसांपासून सलून बंद झाल्याने अन गतवर्षी एका मुलीचे लग्न केल्याने कर्जबाजारी झाला होता, सरकारने सलून दुकाने बंद केल्यामुळे कुटुंबाची उपजिवीका भागत नसल्याने व आर्थिक  देणे पाणी झाल्याने विष पेऊन आत्महत्या केली असून मरण्यापुर्वी त्यांनी चिठीत हे सर्व नमुद केले आहे.


उस्मानाबाद तालुक्यातील सांजा येथील मनोज झेंडे यांच्या कुटुंबात 2 मुलगे एका मुलीचे गतवर्षी लग्न झाले असून पत्नी असा परिवार आहे,रोज सलून दुकानाच्या माध्यमातून मिळणाऱ्या कमाईवर घरप्रपंच सुरू असायला,कोरोना आला अन सर्व काही बघडत गेले, मागचे वर्ष ही असंच गेले अन आता कुठे व्यवस्था सुरळीत होत असताना पुन्हा सलून दुकाने बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला त्यामुळे घरगाडा चालवताना आर्थिक समस्या निर्माण होत होत्या,आधीच डोक्यावर कर्जाचा ओझं अन आता हाताला काम नसल्याने मनोज झेंडे यांनी विष प्राशन करून टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली.नेमकं काय लिहिले आहे चिट्ठीत?


केसकर्तनालयाच्या दुकान मालकाने  आत्महत्या करण्यापूर्वी एक चिट्ठी लिहिली असून, या चिट्ठीत त्यांनी लिहिले आहे की, मी आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येला कोणालाही दोषी ठरवू नये. मी माझ्या जीवाला कंटाळून आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येमुळे माझ्या घरच्यांना त्रास देऊ नये. तसेच माझ्या घरच्या लोकांवर बायको, भावावर कोणतेही आरोप घेऊ नये ही माझी कळकळीची विनंती आहे. सरकारने हातावरचे पोट असणाऱ्या सलून दुकानदाराला कोरोनाचे नियम अटीशर्थी लावून काम करण्याची परवानगी द्यावी अन्यथा प्रत्येक नाभिक  बांधवांना अर्थिक मदत करावी तसेच सांजा येथील मयत मनोज झेंडे यांच्या कुटुंबीयांना अर्थिक मदत करावी असे आवाहन सलून अँड पार्लर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुरेश चौधरी यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या