वीस हजाराची लाच स्विकारताना उस्मानाबाद ग्रामिण पोलीस स्टेशनचा पोलीस शिपाई जाळयात


उस्मानाबाद रिपोर्टर  


पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका केस मधुन   तक्रारदार व एका भावास बाहेर काढ़त आई व अनखी एका भावास  एम सीआर साठी मदत करण्याच्या बदल्यात ३० हजाराच्या लाचेची मागणी करून २० हजार रुपये लाच स्विकारताना ग्रामिण पोलीस ठाण्याच्या पोलीस उप निरिक्षक शेख यांचे मदतनीस पोलीस शिपाई  प्रदीप रामभाऊ तोडकरी यास लाचलुचपत प्रतीबंधक विभागाने सापळा रचुन रंगेहाथ पकडले.  


याबाबत आधिक माहिती अशी की ,तक्रारदार  व त्यांच्या आई आणि दोन भावावर पोलीस ठाणे  उस्मानाबाद ग्रामीण येथे गुन्हा नोंद झालेला होता  सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरीक्षक श्रीमती शेख यांच्याकडे होता पो. उप. नी शेख यांचे मदतनीस  प्रदीप रामभाऊ तोडकरी, पोलीस शिपाई यांनी तक्रारदार यांचेकडे तक्रारदार यांच्या आई आणि एक भावास एम सी आर करून बेल मिळवून देण्यास प्रयत्न/ तपासात मदत केली आणि तक्रारदार आणि त्याचा भाऊ यांना गुन्ह्यातून काढून टाकण्यासाठी दिनांक 17.04.21 रोजी पंचांसमक्ष 30000 रुपये लाचेची मागणी करून  तडजोडी अंती 20000 रु. लाच रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतीबंधक विभागाने सापळा लाऊन रंगेहाथ पकडत गजाआड केले. ही कार्यवाही शनिवार ( दि १७ ) रोजी करण्यात आली.हा सापळा डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि.औरंगाबाद

डाॅ. अनिता जमादार मॅडम. अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद,प्रशांत संपते,पोलिस उपअधीक्षक ला.प्र.वि.उस्मानाबाद यांचे मार्गदर्शनाखाली अशोक हुलगे , पोलीस निरीक्षक, ला प्र वि उस्मानाबाद यांनी व पो. अंमलदार इफतेकार  शेख, विष्णू बेळे,  सिद्धेश्वर तावसकर,चालक दत्तात्रय करडे यांनी यशस्वी केला .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या