पोलीस प्रशासन कोरोना नियंत्रनाच्या कामात तर मटका बुक्क्यावाली बिनधास्त: अतिआवश्यक सेवे प्रमाणे मटक्याची दुकाने सुरू: मटका घेण्यासाठी होतोय लाहान मुलांचा वापर:


रिपोर्टर 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संगळया आस्थापणा जरी बंद असल्या तरी शहरातील मटका बुक्क्या मात्र तेजीत चालत आसलेल्या निदर्शनास येत आहे.शहरातील आनंद नगरमध्ये पोलीस लाईनच्या समोरच आगदी बिनधास्त पणे किराणा दुकान चालवल्या प्रमाणे मटका बुक्क्या चालवल्या जात असुन मटका घेण्यासाठी लाहान मुलाचा वापर केला जात आहे.या बुक्की चालकावर कडक कारवाई करण्याची मागणी या ​परिसरातील नागरीकां कडून होत आहे. 


वाढत्या कोरोनाच्या प्रभावामुळे संपुर्ण प्रशासन कोरोना नियंत्रनाच्या कामात असताना शहरात मटका मात्र तेजीत सुरू असल्याचे दिसत आहे.शहरातील पोलीस लाईन समोर आगदी एखादया आतिअवश्यक सेवेच्या दुकाना प्रमाणे  मटक्याची दुकाने थाटल्याचे दिसत आहे.लहाना पासुन मोठया पर्यत या ठीकानी मटका लावण्यासाठी गर्दी असलेली पाहायला मीळते. कोरोनाच्या आशा भहयावाह परिस्थितीमध्ये किराणा दुकाना प्रमाणे मटका बुक्कया चालवल्या जात आहेत तरी पोलीस प्रशासनाचे लक्ष का? नाही हा प्रश्न निर्माण होत आहे.वाढत असलेला कोरोनाचा प्रभाव पाहता बुक्की चालकांवर कारवाई होणे गरजेचे आहे.आशी मागणी आनंदनगर परिसरातील नागरिकांकडून होत आहे.विशेष म्हणजे मटका बुक्कीवर लाहान मुलांचा वावर जास्त असल्याने त्यांच्या आयुष्यांच्या बरबादीला कोण जिम्मेदार हा देखील महत्वाचा प्रश्न नागरीक पोलीस प्रशासनाला विचारत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या