महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन



उस्मानाबाद

सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, देशात स्त्री शिक्षणाची पहाट जागवत करोडो लोकांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पाडणारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी  कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.

        यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक कुलकर्णी, सामान्य प्रशासनचे नायब तहसीलदार संतोष पाटील, अव्वल कारकून महेश कुलकर्णी, अभिलेखापाल चव्हाण, शाकीर शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या