रिपोर्टरः. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. जिल्ह्यात दररोज किमान २० जण मृत्यू पावत आहेत. अश्या भीषण संकटाच्या काळात मानुसकीला काळीमा फासण-या घटना पाहायला मीळत आहेत.
कोरोनाने मृत्यू पावलेल्या रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकाकडून पाच हजार लाच घेण्याचा प्रकार तुळजापुरात घडला असून. याप्रकरणी पालिकेचा एका कर्मचारी निलंबित करण्यात आला आहे.
बामणी गावातील एक रुग्ण कोरोनाने मृत्यू पावला होता. या मयत रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तुळजापूर नगर परिषदेचा कर्मचारी शंकर कांबळे याने पाच हजार रुपयांची लाच घेतली. त्याची माहिती कळताच तुळजापूर मुख्याधिकारी आशिष लोकरे यांनी कांबळे यास निलंबित केले आहे.
0 टिप्पण्या