परिवार पॅनलच्या जिल्हा प्रचार कार्यालयाचे उद्घाटन.

 

उस्मानाबाद रिपोर्टर 

सोलापूर जनता सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणूक निमित्त उस्मानाबाद येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन भाजपाचे ज्येष्ठ नेते ॲड.मिलिंद पाटील यांच्या हस्ते व भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले.

बँकेच्या व सभासदांच्या हितासाठी मागील अनेक वर्षापासून सभासदांनी परिवार पॅनल वर विश्वास दाखवला आहे. सभासदांच्या विश्वासाला पत्र राहून संचालक मंडळाने बँकेची प्रगती साधली आहे. बँकेचे विद्यमान चेअरमन किशोर देशपांडे यांच्या नेतृत्वातील परिवार पॅनल ला बँकेच्या व सभासदांच्या हितासाठी प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन ॲड.मिलिंद पाटील यांनी केले.

सोलापूर येथून २५ कि.मी. बाहेरील मातदार संघातून कुलकर्णी दत्तात्रय काशिनाथराव (दत्ता कुलकर्णी) यांना परिवार पॅनल कडून उमेदवारी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सभासद मतदारांना परिचित असलेला चेहरा व सहकारातील माहिती, अभ्यास असलेली व्यक्ती म्हणून दत्ता कुलकर्णी यांची ओळख आहे. दत्ता भाऊंच्या पाठीशी उस्मानाबाद मधील मतदार विश्वासाने उभे राहतील असा विश्वास भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी व्यक्त केला.

यावेळी प्रत्येक मतदारांनी “किटली” या चिन्हावर शिक्का मारून १७ व्यक्तींना मतदान करावे व संपूर्ण पॅनल ला विजयी करावे असे दत्ता कुलकर्णी यांनी  आपल्या मनोगतामध्ये सांगितले.

यावेळी भाजपा प्र.का.सदस्य ॲड.अनिल काळे, प्र.का.सदस्य. सतीश दंडनाईक, भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड.नितीन भोसले, डॉ.हर्षल ढंबळ, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, धनंजय रणदिवे, भाजपा धाराशिव शहराध्यक्ष राहुल काकडे, देविदास पाठक, दाजीअप्पा पवार, प्रमोद खंडेलवाल तसेच सभासद मंडळी उपस्थित होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या