सोलापूर जनता बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल सराफ असोसिएशनच्या वतीने दत्ता कुलकर्णी यांचा सत्कार

उस्मानाबाद रिपोर्टर- 

सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीत दत्ता कुलकर्णी हे सर्वाधिक मतांनी विजयी झाले आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल येथील धाराशिव जिल्हा व शहर सराफ असोसिएशनच्या वतीने दत्ताभाऊ कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.  

यावेळी सराफ असोसिएशन जिल्हाध्यक्ष संजय गणेश, सराफ असोसिएशन शहराध्यक्ष रामदास वणवे, विष्णुदास सारडा, प्रकाश खंडेलवाल, प्रमोद खंडेलवाल, सतीशभाऊ घुले, प्रा. गजानन गवळी, विद्यानंद साखरे, विलास थडवे, लक्ष्मण ओमासे, भागवत पोतदार, नारायण टेहरे, अभय व्यास, विजय जाधव, सुशील कुलकर्णी, श्रीकांत दिवटे आदीसह सराफ बांधव उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या