भाजपाच्या जिल्हा समन्वयकपदी जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष नेताजी पाटील यांची निवड


रिपोर्टर 

भाजपाच्या उस्मानाबाद जिल्हा समन्वयकपदी जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष नेताजी पाटील यांची निवड करण्यात आली असुन सदर निवडीचे पत्र भाजपाचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या वतीने देण्यात आले आहे.

सामाजीक,राजकीय आणि संघटन कौशल्य असलेले नेताजी पाटील यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयात पक्ष बांधनीसाठी महत्वाची भुमीका बजावली आहे.त्यांच्या याच कामाचा विचार करूण पक्षाने त्यांच्यावर जिल्हा समन्वयक पदाची जिम्मेदारी सोपवली आहे.या निवडी बददल नेताजी पाटील यांचे पक्षातील कार्यकर्ते आणि सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे. 

  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या