श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेटच्या ए.टी.एम. व्हॅन चे उद्घाटनरिपोर्टर 


श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि.,उस्मानाबाद च्या नुतन मोबाईल ए.टी.एम.व्हॅन चे उद्घाटन भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते व जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड.श्री.नितीन भोसले, संचालक सतीश सोमाणी यांच्या उपस्थिती मध्ये करण्यात आले. 

          

महाशिवरात्री निमित्त उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांच्या सोयीकारीता श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी तर्फे मोबाईल ए.टी.एम. व्हॅन चालू करण्यात आले असुन त्याद्वारे नागरिकांना सुलभ रित्या रोख रक्कम काढता येणार आहे.

          यावेळी श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट चे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी, अध्यक्ष व्यंकटेश कोरे, संचालक ॲड.सचिन मिनीयार,  सिध्दीविनायक मल्टीस्टेट चे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश कामटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार जाधव,हिताची ए.टी.एम.चे प्रशांत जाधव,प्रविण जाधव तसेच श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट चे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या