कळंब शहर व परिसरात अवकाळी चा तडाखा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान


कळंब / रिपोर्टर   


शहर व तालूक्यातील शिराढोण ,अभर्डी पाथर्डी ,मोहा ,खोंदला,सात्रा सह आदी तालुक्यातील अनेक गावात अवकाळी पावसाने हजेरी लावली सध्या ग्रामीण भागात हरभरा, तुर,गहू, ज्वारी आदी पिकाची कापणी सुरु आहे. तालुक्यातील काही  भागात मोठ्या प्रमाणात फळबागा असुन  अनेक भागात केशर आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते चालु वर्षी शेतकऱ्यांना आंबा व द्राक्ष पिकातुन उत्त्पन्न हाती मिळण्याची आशा असताना अवकाळी पावसामुळे आंबा व द्राक्ष पिकाचे नुकसान झाले आहे तर तालुक्यातील   काही भागात गाराचा पाऊस झाल्याने शेतमालाचे व फळ व भाजीपाला पिकाचे नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे काही वर्षे दुष्काळाच्या झळा भोगलेल्या शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस व गारामुळे आर्थिक अडचणी वाढल्या आहेत पावुस एवढा जबरदस्त होता कीकाही भागातील ओडे वनाले ओसांडूं न् वाहत आहेत ,उभ्या पिकात पाणी साचल्याने हातातिल पिके वाया गेली आहेत तर काही भागात झाडे  तर काही भागात विजा कोसळून जनावरे मृत्युमुखी पडले आहेत यामूळे शहरा सह ग्रामीण भागातील विजपुरवठा खंडीत झाला होता ,या अकळी पाऊसा मुळे शेतकत्यांचे मोठे नुकसान झाले आहे अवकाळी पाऊस पडलेल्या सर्व भागातील पिकांचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावे व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकर्‍यांतून जोर धरत आहे तर याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन पीक विमा मंजुरी साठी प्रयत्न करावेत अशीही मागणी शेतकर्‍यांतून होत आहे,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या