परंडा रिपोर्टर
परंडा तालुक्यातील सोनारी गावचा सुपूत्र जवान सागर तोडकरी ( ३१ ) यास रविवारी पाचच्या सुमारास पठाणकोट पंजाब येथे कार्यावर आसताना वीरगती प्राप्त झाली.काल दि १६ रोजी सोनारी येथील त्यांच्या शेतामध्ये शासकीय इतमामात सलामी देवून अंत्यसंस्कार करण्यात आले .
अत्यंत गरीब कुंटूबातील सागरचे प्राथमीक शिक्षण गावातच जि प च्या शाळेत झाले . महात्मा गांधी विद्यालय परंडा येथे माध्यमिक तर रा गे शिदे परंडा येथे महाविद्यालयीन शिक्षण घेवून बार्शी येथे बी सी ए शिक्षण घेवून २०१० मध्ये सैन्यात भरती झाला.अहमदनगर,जम्मू काश्मीर नंतर आता तो पंजाब येथील पठाणकोट येथे कार्यावर होता.दरम्यान रविवारी गस्तीवर असताना पाचच्या सुमारास अपघात होवून वीरमरण प्राप्त झाले. पुणे येथे विमानाने दुपारी बारा वाजता पार्थांव दाखल झाले.सोनारी गावातून पार्थीवाची शेवटची अंत यात्रा मिरवणुक काढण्यात आली यावेळी सागर तोडकरी अमर रहे, जय जवान जय किसान, वंदे मातरम च्या घोषणेने परिसर दुमदूमुन गेला. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पुष्पचक्र अर्पण करून सलामी देवून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
कुटूंबात सागर एकुलता एक होता .
पश्चात आई, वडिल, पत्नी, 3 वर्षाचा मुलगा व दिड वर्षाची मुलगी असा परिवार आहे.
यावेळी भूमचे उपविभागीय अधिकारी, आ . तानाजी सावंत,मा आ ज्ञानेश्वर पाटील, कृषी व पशू संवर्धन सभापती धनंजय सावंत, डि वाय एस पी मोतीचंद राठोड,पंचक्रोशीतील निवत्त जवान, विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी, व ग्रामस्थ अंत्यदर्शनासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थीत होते .
तोडकरी कुंटूबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावावर शोककळा पसरली आहे.अंत्यदर्शनासाठी संबध जिल्हाभरातून हजारो देशभक्त सोनारी येथे दाखल झाले होते .
0 टिप्पण्या