उस्मानाबाद:रिपोर्टर
रयत हीच राज्याचा प्राण असल्याची पहिली शिकवण छ.शिवाजी महाराज यांनी दिली असल्याचे प्रतिपादन परभणी कृषी विद्यापीठाचे माजी कुलगूरु डॉ. वेदप्रकाश पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त डॉ.व्ही.के.पाटील शैक्षणिक संकूलातील आयोजित व्याख्यानात केले.यावेळी धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील,प्रा.फडतरे प्राचार्य सुरज ननवरे,डॉ.कैलास मोटे,प्राचार्य अमर कवडे,डॉ.गाझी शेख,प्रा.हरी घाडगे हे उपस्थित होते.
पूढे बोलताना डॉ.वेदप्रकाश पाटील म्हणाले की,छ.शिवाजी महाराज यांनी प्रतिकूल परिस्थितीत आपले राज्य निर्माण केले.प्रजा ही सर्वस्व त्यांनी मानले म्हणूनच रयत देखील त्यांच्यासाठी जीव द्यायला तयार होती अशी कितीतरी उदाहरणे आपल्याला इतिहासात पहायला मिळतात.राजाची
प्रजेविषयी तळमळीची भावना नसेल तर प्रजा सत्ता उलथवून टाकते हा इतिहास पूर्वीपासून आजपर्यंत आहे. तसेच छ.शिवाजी महाराज यांची युध्दनिती ही १०० वर्ष इतरापेक्षा पुढे होती.म्हणूनच जगात सर्वात मोठे प्रेरणास्थान महाराज होते कारण राजासाठी लोक सहजासहजी मरायला तयार होत होते 'रयत संपन्न तर स्वराज्य संपन्न' हे सुत्र त्यांनी अंमलात आणले.स्वराज्यातील एकही व्यक्ती उपाशी राहत नव्हता व कर्जबाजारी ही नव्हता हे विशेषच आहे.हे ही त्यांनी पुढे बोलताना सांगितले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकूलातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या