दर्पण दिनानिमीत्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन


 

रिपोर्टर 


महाराष्ट्र राज्य पञकार संघ मुंबई, शाखा उस्मानाबाद यांच्या वतीने आज दर्पण दिनानिमित्त मराठी वृत्तपत्र सृष्टीचे आद्यजनक कै.बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी पञकार संघाचे जिल्हाध्यक्ष तथा दैनिक एकमत चे जिल्हाप्रतिनिधी धनंजय पाटील, तसेच राज्यस्तरिय पदाधिकारी जेष्ठ पञकार,संजय पाटोळे, उपाध्यक्ष तथा दैनिक मराठवाडा नेता चे जिल्हा प्रतिनिधी प्रशांत कावरे,कार्यध्यक्ष तथा राष्ट्रीय चॅनल न्युज नेशनचे जिल्हाप्रतिनिधी श्रीराम क्षीरसागर, सचिव तथा मराठवाडा केसरीचे संपादक बिभीषण लोकरे, संघटक,दैनिक त्रीशक्तीचे संपादक कलीम मुसा, दैनिक लातुर समाचार चे जिल्हाप्रतिनिधी  बुबासाहेब डोंगरे,प्रसिध्दी प्रमुख,ई टीव्ही भारतचे जिल्हा प्रतिनिधी कैलास चौधरी, दैनिक जनमतचे  कार्यकारी संपादक आकाश नरुटे,जेष्ट फोटोग्राफर कालिदास म्हेञे,तरूण भारत संवाद चे जिल्हा प्रतिनिधी,सचीन वाघमारे, दैनिक राजधर्मचे जिल्हा प्रतिनिधी हारीशचंद्र धावारे, तसेच सुरेश कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला संघाच्या सर्व सदस्यांच्या वतीने मराठी वृत्तपत्र सृष्टीचे आद्यजनक कै.बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतीमेचे पुजन करण्यात आले.त्यानंतर जिल्हाध्यक्ष धनंजय पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्याला एकजुटीने राहुन शहरासह ग्रामीण भागातील पत्रकारांच्या आडचनी सोडवण्याचे काम करायचे आहे.कारण आजच्या परिस्थितीमध्ये पत्रकारांना आनेक आडचनीचा सामना करावा लागत आहे.असे मत अध्यक्ष पाटील यांनी व्यक्त केले.तसेच राज्यस्तरीय पदाधिकारी व जेष्ठ पत्रकार संजय पाटोळे यांनी महाराष्ट्र राज्य पञकार संघाची कार्यपध्दती आणि उददेश यावरती उपस्थितांना मार्गदर्शन केले.तर संघाला उभारणी देण्यासाठी मोठया प्रमाणात सदस्य नोंदनी करू असे मत लोकरे यांनी व्यक्त केले.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार संघाचे कार्यकारी अध्यक्ष श्रीराम क्षीरसागर यांनी मानले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या