निवडणुकीच्या तोंडावर राजकारणामुळे होतेय बेंबळी ग्रामपंचायतची बदनामी


रिपोर्टर:चौदाव्या वित्त आयोगाच्या कामाबबत बेंबळी ग्रामपंचायतच्या प्रशासक आणि तत्कालीन सरपंचास जबाबदार धरत आप्पर विभागीय आयुक्ता कडून देण्यात आलेल्या सुचनेचे आम्ही पालन करतो मात्र फक्त आणि फक्त राजकारण म्हणून आम्हाला बदनाम करण्यात येत असल्याच्या प्रतिक्रीया बेंबळी ग्रामचंयातचे ग्रामसेवक एम.बी.करपे यांनी महाराष्ट्र लाईव्ह शी बोलताना दिल्या. 


चौदावा वित्त आयोग व दलित वस्ती सुधार योजनेच्या कामात अनियमीतता असल्याचा ठपका ठेवत आप्पर विभागीय आयुक्तांनी काही सुचना केल्या आहेत.ग्रामपंचायत च्या माध्यमातुन करण्यात आलेल्या कामामध्ये कसलाही भ्रष्टाचार नसुन निवडणुकीच्या तोंडावर ग्रामपंचायत आणि तत्कालीन सरपंचांना बदनाम करण्याचा डाव असल्याचे ग्रामसेवक करपे यांनी सांगीतले. चौदावा वित्त आयोग व दलित वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातुन कुठलीही नियमबाहय कामे करण्यात आलेली नाहीत.झालेली संगळी कामे ही शासनाच्या आटी व शर्तीच्या अधिन राहुन करण्यात आली आहेत.प्रतेक काम करतेवेळी ग्रामपंचायत च्या सर्व सदस्य आणि पदाधिकारी यांना विचारात घेवून आणि नियमाप्रमाणे ठराव पास करूणच करण्यात आलेली आहेत. मात्र ग्रामपंचायतच्या विकासकामामध्ये राजकारण घुसल्याने आनेक प्रश्न निर्माण झाल्याचे ग्रामसेवक करपे यांनी सांगीतले.  


तत्कालीन सरपंच 


माझ्या कार्यकाळात जी कामे झाली आहेत.त्यात कुठल्याही प्रकारचा भ्रष्ठाचार किंवा अनियमीतता झालेली नाही.सर्व कामे शासनाने घालुन दिलेल्या नियमानुसार पार पडलेली आहेत.सदरची कामे करते वेळी संपुर्ण सदस्यांची मान्यता घेवूनच कामा बददलचा ठराव पास करण्यात आला.निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांकडून करण्यात आलेले आरोप हे चुकीचे आणि बिनबुडाचे आहेत.यात कुठलाही भ्रष्ठाचार झालेला नाही.   


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या