मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षा सौ.प्रेमाताई पाटील यांचा सत्कार.

                  


रिपोर्टर: 


मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समिती 2021 च्या नवनियुक्त अध्यक्षा नगरसेविका सौ.प्रेमाताई पाटील यांचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी समितीचे जेष्ठ मार्गदर्शक भालचंद्र जाधव , डाॅ.सुभाष वाघ,अग्निवेश शिंदे,माजी अध्यक्ष रोहीत बागल ,जयराज खोचरे ,मयुर काकडे, खंडू राऊत,अभिराम पाटील,ओम नाईकवाडी,संकेत सुर्यवंशी यांची उपस्थिती होती. यावेळी समितीने सन 2020 मध्ये केलेल्या कार्याची माहिती माजी अध्यक्ष  खंडू राऊत यांनी दिली. तर सत्कारास उत्तर देताना नवनियुक्त अध्यक्षा नगरसेविका सौ.प्रेमाताई पाटील यांनी या वर्षी समितीच्या वतीने जिजाऊ पुजन,भव्य रक्तदान शिबीर , महिलांची रॅली,प्रतिवर्षाप्रमाणे समाजातील विविध क्षेञातील उल्लेखनीय कार्य करणार्यांचा विविध पुरस्कार देऊन सन्मान ,समितितील कार्य करणार्याच्या मातांचा सन्मान असे अनेक कार्यक्रम घेण्याचा संकल्प व्यक्त केला.  या वेळी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ परिवाराच्या वतीने प्रसाकीय अधिकारी आदित्य पाटील यांच्या वतीने यांनी समितीतील मार्गदर्शकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुञसंचालन प्रदिपकुमार गोरे यांनी केले तर आभार खोचरे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या