हुतात्मा दिनाचे नगरपालिकेला वावडे आहे काय? सेव्ह फार्मस विडोज फाऊंडेशनचे निवेदन



 रिपोर्टर 

स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या उस्मानाबाद नगरपालिकेमध्ये आज ;30 जानेवारीलाद्ध हुतात्मा दिन साजरा करणे अनिवार्य असतानाए हा दिन साजरा न केल्याने नगरपालिकेला या दिनाचे वावडे आहे काय घ् अशी विचारणा एका निवेदनाच्या माध्यमातुन    सेव्ह फार्मस विडोज फाऊंडेशन च्या अध्यक्ष सौ शीलाताई उंबरे,पेंडारकर यांनी केली आहे. सदरचे निवेदन  उस्मानाबाद जिल्हा धिका्री यांना दिले आहे.


     राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार शासकीय कार्यालयासह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये थोरए क्रांतिकारकएविचारवंत व्यक्तींच्या जयंती आणि पुण्यतिथी साजरा करण्यात याव्यात तसे आदेश आहेतण् मात्र उस्मानाबाद नगरपालिकेमध्ये 14 एप्रिल अर्थात घटनेचे शिल्पकार डॉण् बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती शिवाय एकही जयंतीचा कार्यक्रम घेतला जात नाहीण्नगरपालिकेने  शासनाने ठरवून दिलेल्या जयंतीएपुण्यतिथीचे कार्यक्रम  वेळच्या वेळी घेणे अपेक्षित आहे मात्र नगराध्यक्ष देखील अशा कार्यक्रमाकडे पाठ फिरवतात हे दिसून येतेण् पालिकेचे मुख्याधिकारीए कार्यालय अधीक्षक कार्यक्रमाकडे साफ दुर्लक्ष करतातण् सत्यए अहिंसाए विश्वबंधुता अशा उच्च मानवी मूल्यांचा आजीवन पुरस्कार करणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार आजही समाजासाठी तितकेच अनुकरणीय आहेतण्त्यांची पुण्यतिथी हुतात्मा दिन म्हणून शासनाकडून साजरी केली जातेण्


      नगराध्यक्ष देखील याकडे लक्ष देत नसल्याने गेल्या अनेक वर्षापासून उस्मानाबाद नगरपालिका शासकीय अध्यादेशाचे उघड उघड उल्लंघन करताना दिसून येत आहेण् ही बाब अत्यंत गंभीर असून जिल्हाधिकार्‍यांनी या प्रकरणी तात्काळ चौकशी करावी व संबंधित दोषी असणाऱ्या व्यक्तीवर प्रशासकीय कारवाई करावी अन्यथा याप्रकरणी तीव्र आंदोलन करण्यात येईलण् असा इशारा सेव्ह फार्मस विडोज फाऊंडेशन च्या  वतीने देण्यात आला आहे.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या