धाराशिव कारखाण्याच्या २ लाख ११ हजार १११ व्या साखर पोत्याचे पुजनरिपोर्टर:चोराखळी येथिल धाराशिव साखर साखर कारखान्याच्या ८ व्या गळीत हंगामातील २ लाख ११ हजार १११ व्या साखर पोत्याचे पूजन शेतकऱ्यांच्या मुलांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सर्व संचालक व मित्रपरिवाराची उपस्थितीती होती.


जो शेतकरी आपल्या शेतातील उसाची जपनुक करूण कारखाना चालवतो, त्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या हस्ते साखरेची पोती पुजन करताना मनस्वी आनंद झाला. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्यांना कधीच मान सन्मानाची अपेक्षा नसते.असे मत कारखाण्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी व्यक्त केले.यावेळी ऊस कारखान्यात आल्यापासुन ते साखर निर्मिती पर्यंत सगळी प्रकिया कशा प्रकारे पार पाडली जाते याची माहीती चेअरमन अभिजीत पाटील यांनी शेतकऱ्यांना दिली.


पुढे बोलताना पाटील म्हणाले की गळीत हंगामाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. कारखाना हंगाम सुरळीत व यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशासन, तोडणी-वाहतूक यंत्रणेची नियोजनपूर्वक वाटचाल सुरू आहे. चालू हंगामात प्रतिदिन जास्तीत जास्त ऊसाचे गाळप करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.यागळीत हंगामातील २ लाख ११ हजार १११ व्या साखर पोत्याचे पूजन करून यावेळी चेअरमन अभिजीत पाटील यांनी हंगामातील कामगिरी बद्दल सर्व अधिकारी, कर्मचारी, कामगार यांचे कौतुक केले.   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या