कळंबमध्ये ग्रामपंचायतीवरून भाजप-सेनेत जुंपली; वंचित बहुजन आघाडीचा ८ ग्रामपंचायतीवर दावा



कळंब / रिपोर्टर  

नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल  जाहीर झाला आहे. या निकालानंतर शिवसेना भाजपात चांगलीच झुंपलेली पाहायला मिळत आहे. तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली होती यापैकी सहा ग्रामपंचायती या बिनविरोध निघाल्या. उर्वरित ५३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल दि १८ रोजी लागला आहे. या निकालानंतर भाजप- सेनेत कोणाच्या किती ग्रामपंचायती यावरून चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे.

भाजपचे तालुकाध्यक्ष अजित पिंगळे यांनी आपल्या फेसबुक पोस्ट द्वारे ३५ ग्रामपंचायतींवर निर्विवाद वर्चस्व मिळविल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे यांनी ३१ ग्रामपंचायत या आमच्या ताब्यात असल्याचे सांगत उर्वरित ८ ग्रामपंचायती या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमच्या ताब्यात आल्याचा दावा केला आहे. तसेच या ग्रामपंचायतीची आमची यादी तयार असून तसे पत्र देखील आमच्याकडे असल्याचे त्यांचे मत आहे.


यावरून दोन्ही पक्षाच्या समर्थकांनी सोशल मीडियावर जोरदार पोस्ट व्हायरल करायला सुरुवात केली आहे. यातच बहुजन वंचित आघाडीने उडी घेऊन आमच्या वंचित बहुजन आघाडीचा ८ ग्रामपंचायत ताब्यात असल्याचा दावा केला.

त्यातच वंचित बहुजन आघाडीने देखील यात उडी घेतली असून निवडणूक पार पडलेल्या तालुक्यातील एकूण ५९ ग्रामपंचायतीपैकी ८ ग्रामपंचायत या आमच्या ताब्यात आल्या असून  उर्वरित गावांमध्ये ८० ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीत विजयी झाल्याचे पत्रक वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ मळगे यांचे पत्रक त्यांनी समाजमाध्यमात व्हायरल केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या