परंडा तालुक्यातील अनेक गावात प्रस्थापितांना धक्का - आसू त सेनेचा तर कंडारीत राष्ट्रवादीचा सुफडा साफ .

 




  रिपोर्टर: शंकर घोगरे 


वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या अनेक गाव पुढाऱ्यांना मतदारांनी कायमचे घरी बसवून  झटका दिला आहे.बहुतांश ग्रामपंचायत मध्ये नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आसून प्रस्थापितांचे गड ढासळले आहेत.

सबंध तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या कंडारी ग्रामपंचायतचा धक्कादायक निकाल आला आसून  शिवसेनेचे राहूल डोके यांनी सर्वच्या सर्व ९ जागा जिंकून भगवा फडकावला आहे .

येथे मा. जि. प. सदस्या मेघा धनंजय मोरे यांचा पराभव झाला असून विद्यामान सरपंच विश्वास मोरे यांचाही मोठया फरकाने पराभव झाला आहे .

सोनारी येथे जिप मा पशुसंवर्धन सभापती नवनाथ जगताप यांच्या महा विकास अघाडीने ९ पैकी ८ जागांवर विजय मिळून सत्ता काबीज केली आहे .

आवार पिंपरी येथे माजी आ ज्ञानेश्वर पाटील गटाचे विद्यामान सरपंच सुरेश डाकवाले यांच्या जनसेवा परिवर्तन पॅनलने ७ पैकी ४ जागा जिंकून सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवले आहे.तर. चिंचपूर येथे रणजीत पाटील यांच्या ४० वर्षाच्या सत्तेचे पारिर्वतन झाले असून येथे भाजपाचे युवा नेते अनिल पाटील यांच्या जनशक्ती परिवर्तन पॅनलने ७ जागा जिंकल्या तर रणजीत पाटीलच्या पॅनलला ४ जागेवर समाधान मानावे लागले आहे .

डोंजा येथे राष्ट्रवादीचा रेणुका माता ग्रामविकास आघाडीने ९ पैकी ८ जागा जिंकून शिवसेनेचा गट काबीज केला आहे . येथे आ तानाजी सावंत यांचे विश्वासू रामचंद्र घोगरे यांच्या पॅनलला केवळ १ जागा मिळवता आली .

साकत येथे मा आ ज्ञानेश्वर पाटील गटाचे बालाजी सावंत व आबा जाधव यांच्या शेतकरी ग्रामविकास पॅनलने ७ पैकी ४ जागा जिंकल्या आसून ग्रामपंचायत वर भगवा फडकावला आहे .

कौडगाव येथे भाजपाचे मधूकर ठवरे व तुकाराम हजारे यांच्या संत बाळूमामा ग्रामविकास आघाडीने ९ पैकी ५ जागेवर विजय मिळवला आहे . येथे शिवसेनेचे जयदेव गोफणे व आशोक पाडूळे यांच्या पॅनलला ४ जागा मिळवता आल्या .


दहिटणा - बोडखा येथे सत्ता परिर्वतन झाले असून शिवसेनेच्या मा आ ज्ञानेश्वर पाटील गटाचे सोमनाथ करडे ., श्रीमंत काकडे, प्रकाश काकडे यांच्या ग्रामविकास परिवर्तन आघाडीने ७ पैकी ४ जागा जिंकल्या आहेत . तर राष्ट्रवादीच्या स्वाभीमानी पॅनलने २ जागा जिंकल्या . सातव्या जागेसाठी दोन्ही उमेदवारांना १५० / १५० असे समांतर मतदान मिळाल्याने टॉस करण्यात आले यात राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय झाला .


आनाळा

येथे राष्ट्रवादीची ४० वर्षाची सत्ता उलथवून टाकण्यात कालिकादेवी परिर्वन पॅनलला यश आले असून ७ जागा जिंकल्या आहेत . तर राष्ट्रवादीच्या दत्ता पाटील यांच्या पॅनल ला केवळ २ जागा मिळाल्या आहेत .


रोहकल

येथेही सत्ता परिर्वतन झाले असून सेना भाजपा पॅनलला ४ जागा मिळाल्या तर राष्ट्रवादीच्या पॅनलला ५ जागा मिळाल्या आहेत .

येथे पाचव्या जागेसाठी उमेदवारांना समांतर मते मिळाल्याने टॉस करण्यात आला यामध्ये राष्ट्रवादीची १ जागा वाढून ५ जण विजयी झाले .


राजूरी

येथे शिवसेना जिल्हाप्रमुख गौतम लटके यांना झटका बसला असून त्यांच्या ग्रामविकास पॅनलला ३ जागा मिळाल्या आहेत . तर आ ज्ञानेश्वर पाटील गटाचे पै श्रीराम गोडगे यांच्या महाविकास अघIडीने ४ जागा मिळवून सत्ता कायम ठेवली आहे .


पिंपळवाडी -ब्रम्हगाव


येथे सत्ता पालट झाला असून आ ज्ञानेश्वर पाटील गटाच्या ग्रामविकास परिवर्तन पॅनलने ५ जागेवर विजय मिळवला आहे .

तर राष्ट्रवादीच्या स्वाभीमानी ग्रामविकास पॅनल ला ४ जागा मिळवता आल्या .


आसू

येथे राष्ट्रवादीने मुसंडी मारली असून ३० वर्षाची सत्ता उलथवली आहे . मारुती मासाळ यांच्या महा लिंगशय परिवर्तन पॅनलने सर्वचा सर्व ९ जागा जिंकल्या असून . शिवसेनेचे मा प स  सभापती शंकर इतापे यांच्या पॅनलला एकही जागा मिळवता आली नाही .


वाकडी

येथे राष्ट्रवादीने गड राखला असून धनंजय हांडे यांच्या पॅनलने ६ जागा जिंकल्यTआहेत तर सेना भाजपाच्या पॅनलला ५ जागा जिंकता आल्या आहेत . येथे राष्ट्रवादी सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी झाली आहे .


लोणी

येथे भाजपाचा गड ढासळला आसून येथे महाविकास अघाडीने ७ जागा जिंकल्या आहेत तर भाजपचे जि उपाध्यक्ष सुखदेव टोंपे यांच्या सहारा ग्रामविकास पॅनलला केवळ २ जागा मिळाल्या आहेत .


शिराळा

येथे मा आ ज्ञानेश्वर पाटील यांचे कट्टर समर्थक रेवण ढोरे यांच्या पॅनलने सत्ता कायम ठेवली असून ९ पैकी ६ जागेवर मिळवला आहे . तर येथे राष्ट्रवादीला ३ जागेवरच समाधान मानावे लागले आहे .


वागे गव्हाण

येथे सत्ता बदल झाला असून अमोल काळे यांच्या पॅनेलला ४ तर भालू पाटील गटाला ३ जागा मिळाल्या आहेत .


एकंदरीत तालुक्यात अनेक ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर झाले असून अनेक दिग्गजांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला आहे . अनेक ग्रामपंचायत मध्ये तरुणांनी दमदार एंट्री केली असून मतदानाचा वाढता टक्का मात्र प्रस्थापीता धक्का देण्यास कारणीभूत ठरला आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या