रिपोर्टर:
जिल्हयातील नगरपरिषदा आणि नगर पंचायतेच्या विकासासह उस्मानाबाद शहराच्या विविध महत्वाच्या कामा बाबात नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकार यांच्या वतीने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
आज उस्मानाबाद येथे शहर पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण करण्यासाठी महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आले आसता.उस्मानाबाद शहराचे नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांनी शहरासह जिल्हयातील नगरपरिषदा आणि नगर पंचायतेच्या विकासासाठी लगणारे बदल आणि उस्मानाबाद शहरासाठी उजनी ते उस्मानाबाद समातंर पाणी पुरवठा योजना मिळावी तसेच शहरातील नाटयगृहास निधी देण्यात यावा त्याच बरोबर शहरातील अग्नीशामक सेवाकेंद्र बांधकामासाठी अनुदान देण्यात यावे.ओदयोगिक नागरी अधिनियमन
1965 नुसार दुरूस्ती व सुधारणा करण्यासाठी नगरपरिषदेचा अनुभव असलेल्या राजकीय व्यक्तीसह समीती स्थापन करण्याची मागणी नगराध्यक्ष निंबाळकर यांनी केली आहे.जिल्हयातील नगर परिषदेचा वाढीव साहयक अनुदान मागणी आणि संवर्ग आकृतीबांधातील रिक्त पदांची भरती करावी आशा प्रकारच्या विकासात्मक मागण्या नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
0 टिप्पण्या