सोनारी ,कंडारी , जवळा , लोणी व डोंजा ग्रामपंचायतीमध्ये कोण मारणार बाजी -- राष्ट्रवादी , शिवसेना , भाजप आपआपले गड राखणार का ?

 


शंकर घोगरे परंडा 


 परंडा तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतीसाठी आज शुक्रवारी मतदान होत असून ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाडयात मुरबी पुढारी व नवखे विरोधी तरूण उमेदवार अशी थेट लढत होत असून यात मुरबी पुढारी का तरूण उमेदवार बाजी मारणार ? याकडे तालुका वाशीयाचे लक्ष वेधले आहे .

कोरोना महामारी संकट असताना पहिल्यादांच ग्रामपंचायतीच्या निवडणूकीस पुढाऱ्यासह उमेदवार आणि मतदार तीघेही सामोरे जात आहेत .  सोनारी, कंडारी या गावात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व असून जवळा या गावात शिवसेनेचे वर्चस्व आहे तर डोंजा या गावात शिवसेना व राष्ट्रवादीचे समान वर्चस्व आहे . लोणी या गावात भाजपाचे एकहाती वर्चस्व आहे त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या मतदान प्रक्रियतून कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहचली असून गाव पुढारी आपआपले गड पुन्हा राखणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे तर तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा प्रचार गाठीभेठी घेऊन केला गेला असुन तरूण उमेदवार तर सोशल मीडियातून प्रचार यंत्रना राबवित गेला होता . गुरूवारी मकर संक्रांत संपली असून शुक्रवारी मतदार कोणावर संक्रांत आणणार याचा फैसलाही १८ जानेवारीला होणार आहे .

तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतीसाठी १५ जानेवारी रोज मतदान होत असून प्रशासनाची तयारीही पूर्ण झाली आहे मतदानासाठी २०२ बुथ केंद्राची व्यवस्था करण्यात आली असून यासाठी ९०० कर्मचारी राखीवसह नेमणूकीवर आहेत . तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे परंडा तालुक्यात ७० ग्रामपंचायतीसाठी निवडणूक जाहिर झाली होती . यातील ५ ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्याने उर्वरित ६५ ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी मतदान होत आहे तर ४७९ उमेदवार निवडून येणार आहेत त्यासाठी १ हजार ५० उमेदवार आपले नसीब अजमावत आहेत .


चौकट - गुरूवारी सकाळीच मतदान यंत्र घेऊन लालपरी एसटी बस गाडया ग्रामीण भागातील बुथ केंद्राकडे रवाना झाल्या असून प्रशासनाच्या वतीने नायब तहसिलदार व कर्मचाऱ्यांच्या उपस्थीत श्रीफळ फोडून पुजा करण्यात आली  निवडणूकीच्या अनुषंगाने लालपरी मतपेट्या घेऊन आल्याचे पाहताच आता मतदार राजा काय करतो या गोष्टीकडे नागरिकांचे लक्ष लागले असून  उमेदवारांची धाकधुक मात्र वाढल्याचे दिसून आले .


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या