आमडदे ग्रामपंचायत निवडणूकीत समिधा विकास पॅनल ला विजयी करा-भोसले

 जळगाव रिपोर्टर आमडदे गावाचा विकास करण्यासाठी समीधा विकास पॅनलला विजयी करण्याचे आवहान भोसले यांनी केले आहे.
ग्रामिण जळगाव- ग्रामपंचायत सार्वञिक निवडणूकीचा नुकताच फड पेटला असून 13 जागेसाठी निवणूक होत आहे. तिरंगी लढत पहावयास मिळत आहे. उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. आमडदे गावातील म्हणावा तेवढा विकास झालेला नाही गावाची ओळख ही संपूर्ण जळगाव जिल्हात चांगली आहे. पण विकास कामात गावाचा विकास खुंटलेला आहे. विकासाला गती देण्यासाठी समिधा विकास फांऊडेशन या निवडणूकीच्या रणधुमाळीत उडी घेतली मागिल तीन वर्षापूर्वी अनेक सामाजिक उपक्रम समिधा फाऊंडेशन च्या माध्यमातून झालेली आहेत. या कार्याच्या बळावर समिधा विकास पॅनल चे उमेदवार या निवडणूकीत आपले कार्याचे जाहीर प्रगटन केलेले डिजिटल फलक चौका चौकात लावून कामाची पावती थेट जनतेसमोर ठेवली आहे.20 वर्षापासून प्रलंबित असलेला सुतारबर्डी तलावाचा विषय मार्गी लावला ऐन निवडणूकीत कामाच्या मंजूरी च्या आशयाचे पञ समिधा फाऊंडेशन च्या नावे प्राप्त झाले. तो एक विकासाचा मुद्दा समोर आल्याने सत्ताधारी यांना अनेक महत्वाचे विषय मार्गी लावण्यापासून हतबल झाल्याने गावपुढारी यांना मतदानासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. आमडदे गावात एकूण तीन पॅनल असून समिधा फाऊंडेशन प्रथमतच नशीब अजमावत आहे. त्यातूनच त्यांचा जाहीरनामा प्रकट केल्याने वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. समिधा विकास पॅनल चे एकूण 12 उमेदवार प्रथमच आपले नशीब आजमावत आहे. पाटील ज्ञानेश्वर,ठाकरे लिलाबाई,पाटील शिलाबाई,पाटील कांचन,पाटील शेखर,भोसले मधुकर पाटील योगिनी पाटील शालिनी,भोसले पंकजकुमार,कोळी मिराबाई,पाटील शोभाबाई मोरे सुलाबाई हे समिधा विकास पॅनल चे अधिकृत पहिल्यांदा निवडणूकीत आपले नशीब अजमावत असून मागिल तीन वर्षाच्या कार्याच्या बळावर आपले मत मत मांडत आहेत. संचारबंदी च्या काळात मागिल 6 महिन्यापासून पुणे, मुंबई या शहरातील अनेक नवतरूण युवक गावात असल्याने त्यांचा कौल ही परिवर्तनाच्या दिशेने आहे. तसेच शेवटी वर्तमानातच कळेल की मतदार कुणाला कौल देईल. समिधा विकास पॅनल विजयी करा गावाचा विकासाचा ब्लाॅक भरून काढणार राजकीय पार्श्वभूमि नसलेले शेतकरी कुटूंबातील नवतरूण एकञ येऊन गावच्या विकासाच्या हेतूने पॅनल उभा केला असल्याचे समिधा पॅनल प्रमूख शेखर भोसले यांनी सांगीतले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या