महिला,मुलींवरील अत्याचाराच्या घटनेत सहभागी गुन्हेगारांवर तत्काळ कारवाई करावी भारतीय जनता युवा मोर्चाची मागणी



रिपोर्टर: उस्मानाबाद 



महिला, तरूणी, अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनेतील गुन्ह्यात सहभागी असलेल्या गुन्हेगारांवर तत्काळ कठोरात कठोर कारवाई करावी आशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. 

भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.  

महाराष्ट्र  राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये अल्पवयीन मुली, महिला यांच्यावर अनेक ठिकाणी अत्याचार झाले. लाॅकडाउनच्या काळामध्ये हाॅस्पीटलमध्ये सुध्दा महिलांवर अत्याचार झाले. पुणे, पेन, रायगड येथील बलात्काराच्या आरोपाखाली तुरूगांत शिक्षा भोगत असलेल्या आणि पॅरोलवर सुटका झालेल्या आरोपीने 3 वर्षीय आदिवासी मुलीवर अत्याचार करून तीची हत्या केली. धाराशिव  जिल्हयात ही मुलीवर अत्याचार केला गेला. त्याचबरोबर औरंगाबाद येथे ही नौकरीचे आमिश दाखवून अत्याचार केल्याची घटना समोर आली. पण त्या संशयिताची अजून कुठल्याही प्रकारची चौकशी केली गेली नाही. या दुर्देैवी घटना महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. उध्दव ठाकरे सरकारच्या जेष्ठ नेत्या निलमताई गोऱ्हे यांनी एक प्रसिध्दी पत्रक काढले व त्यामध्ये त्यांनी उध्दव ठाकरे सरकारमध्ये सहभागी असलेल्या पक्षाच्या पदाधिकार्याचा नामोल्लेख केला. तरी देखील हे ठाकरे सरकार व गृह मंत्र्याने आत्तापर्यंत झालेल्या दुर्दैवी घटना यावरती कुठल्याही प्रकारचे ठोस पावले उचलली नाहीत. याच सरकारने गाजावाजा करत महिलांवरील आत्याचार रोखण्यासाठी ‘शक्ती’ हा कायदा पुढे आणला. पण याची अंमलबजावणी करण्यास सरकार कुचकामी ठरत आहे. त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांना स्वतच्या पक्षा विरूध्द तसेच सरकार विरूध्द प्रसिध्दी पत्र काढण्याची वेळ आली. स्वतः निलम गोऱ्हे  या नेहमी महिलांचा अत्यंत कळवळा घेवून काम करतात. पण त्या सुध्दा हतबल झालेल्या दिसत आहेत. भारतीय जनता मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांतजी पाटील यांच्या सुचनेनुसार व  आ.राणाजगसिंह  पाटील साहेब प्रदेश सरचिटणीस राहुल जी लोणीकर यांच्या मार्गदर्शनाने  आम्ही भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आवाहन करतो की, या ‘शक्ती’ कायद्यास लवकर मुर्त स्वरूप देवून ज्या काही महिलांवरील व युवतीवरील अत्याचाराच्या घटना राज्यात घडलेल्या आहेत. जे गुन्हेगार आहेत ज्यांचा या गुन्ह्यात सहभाग आहे, अशा  सर्व गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई करावी अन्यथा सरकारला भारतीय जनता युवा मोर्चाच्या तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल.आशा प्रकारचे निवेदन भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने देण्यात आले आहे. 

यावेळी गजानन नलावडे, विनोद निंबाळकर, अमोल राजेनिंबाळकर, सुजित साळुंके, प्रितम मुंडे, सचिन लोंढे, सुनिल पंगुडवाले, राहुल शिंदे, सुरज शेरकर, गणेश  इंगळगी, शरीफ शेख, भगवंत गुंड, शकर मोरे, पुजा राठोड, मिताली राउत, प्रसाद मुंडे, अक्षय किशोर विंचुरे, शेख नसरोददीन मैनोददीन यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते . 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या