तुळजापूर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीवरील भाजपचा दावा खोटा: महाविकास महाविकास आघाडी



तुळजापुर तालुक्यात 4 गावे बिनविरोध तर एका गावाचा निवडणूकीवर बहिष्कार 


रिपोर्टर:अनिल आगलावे 

जिल्ह्याचे लक्ष लागून राहीलेल्या तुळजापूर तालुक्यातील 53 ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये चार ग्रामपंचायत बिनविरोध आले आहेत तर एका ग्रामपंचायत वर मतदारांनी बहिष्कार टाकला होता. यामध्ये 34 ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीने
तर 26 ग्रामपंचायतीवर भाजपाने वर्चस्वाचा दावा केला आहे.


महाविकास आघाडीच्या वतीने तुळजापूर  शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन 34 गावच्या ग्रामपंचायतवर वर्चस्व राखले असून तसेच 26 ग्रामपंचायतवर भाजपच्या वतीने करण्यात आलेला दावा चुकीचा व दिशाभूल करणारा असल्याचे सांगण्यात आले.

महाविकास आघाडीच्या वतीने निवडून आलेल्या ग्रामपंचायतसाठी ओळख परेड करून आम्ही ग्रामपंचायती जाहीर करू असेही सांगण्यात आले तर तालुक्यात महाविकास आघाडीचे वर्चस्व असल्याचं या पत्रकार परिषद मध्ये महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी ऍड.धीरज पाटील,अमर मगर, शिवाजी गायकवाड,गोकुळ शिंदे, श्याम पवार,जगन्नाथ गवळी,सुनील रोचकरी, सुधीर कदम,दिलीप मगर,दिगंबर खराडे, अमर चोपदार,खंडू जाधव,दत्ता डांगे, नितीन रोचकरी,बालाजी खराबे,संदीप गंगणे,महेश चोपदार,फिरोज पठाण आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या